!! जीवन !!

0
564

   !! जीवन ! !

राजूरा, चंद्रपूर -किरण घाटे – महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठावरील काव्यकुंजच्या मुख्य संयाेजिका सराेज हिवरे यांनी शब्दांकित केलेला जीवन हा एक संक्षिप्त लेख आज खास वाचकांसाठी आम्ही येथे देत आहाे ! “जीवन” हे आपल्याला ईश्वराने दिलेली एक सुंदर अशी देणगी आहे. आपण खूप भाग्यवान आहो म्हणूनच ईश्वराने आपल्याला ही देणगी दिली आहे. म्हणूनच या देणगीचा आपण चांगल्या ठिकाणीच उपयोग केला पाहिजे. आपण आपल्या जीवनाला खेळ समजायचं नाही. आपल्याला हे जीवन फक्त्त जन्माला येऊन मारण्यासाठी ईश्वराने दिलेलं नाही. तर या मानवी जीवनात काहीतरी चांगले कर्तव्य व चांगले कार्य करून आपले नाव जेणे करून नेहमी साठी लोकांच्या स्मरणात राहील. जीवन जगायचे म्हंटले तर संघर्ष हा करावाच लागतो. आपल्याला प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जावेच लागते.

” जीवन

मे समस्याए तो

हर दिन नयी खडी है…

जीत जाते है वो

जिनकी सोच बडी है… l

म्हणूनच हिमतीने हारा पण हिम्मत हारू नका.

कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो पण हिरा चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो. मानवी जीवन म्हंटले की सुख दुःख, चढ उतार, आणि कठीण प्रसंग हे येणारच आहे म्हणूनच प्रत्येकाने आपल्यावर

काही कठीण प्रसंग समोर येताच त्याला घाबरून जाऊ नका माघार घेऊ नका. आणि निराश होऊन आपले जीवन संपविण्याचा विचार कधीही करू नका.कारण मरणे किंवा माघार घेणे हे योग्य नाही तर, कठीण प्रसंगाचा सामना करून त्या प्रसंगातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे हा त्यावरील उपाय आहे आणि आवश्यक आहे.

आपण जीवन जगत असतांना प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे आणि परफेक्ट होईलच हे जरुरी नाही. तर त्या गोष्टीला परफेक्ट बनवीन्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे ” हे वाक्य आपल्याला माहितीच आहे. कारण जीवनात सतत प्रयत्न करत राहाल तर यश हे तुमच्याच पदरात पडल्या शिवाय राहणार नाही. कारण जीवन जगत असतांना कित्येक वेळा आपल्याला अपयश येते आपल्याला हार पत्करावी लागते. पण काळजी करायची नाही. आपण जर सतत प्रयत्न केले तर एकदिवस तुम्ही जिंकल्याशिवाय राहत नाही. आपल्या दिलेल्या मानवी जीवनाला ईश्वर सुंदर बनवत नाही तर आपल्याला आपल्या चांगल्या कर्तव्याने, सकारात्मक विचाराने आणि प्रामाणिक प्रयत्नांची सांगड घालून आपले जीवन सुंदर बनवावे लागते. आणि सतत प्रयत्न करून आपले जीवन सुंदर बनल्याशिवाय राहत नाही.

कारण प्रामाणिक प्रयत्न केले की यश आपोआप मिळते कधी लवकर, कधी उशिरा पण मिळते नक्की.

तुम्हाला माहिती आहे. आपलं जीवन हे एका परीक्षेसारखं आहे

नियती प्रत्येकाला वेगळी वेगळी प्रश्नपत्रिका देते. आपल्याला आपण जो अभ्यास केला आहे त्याच अभ्यासाच्या भरवश्यावर ती दिलेली प्रश्न पत्रिका सोडवायची असते. आपण आपल्या विचाराचा मार्ग सकारात्मक दिशेने अवलंबने फार महत्वाचे असते. आपण जर सकारात्मक विचार सदैव करीत राहिलो. तर आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळते. तुम्ही इतरांचा सल्ला जरूर घ्या. पण एक गोष्ट लक्षात असू दया. “ऐकावे जनाचे करावे मनाचे “.म्हणून स्वतः विचार करूनच निर्णय घ्या. ज्या दिवशी तुम्हांला जगण्याचा हेतू गवसला त्या दिवसापासून तुमच्या जीवनाला खऱ्या अर्थाने सुरवात होते असं म्हणायला हरकत नाही.. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. या प्रवासात अनेकदा अपयशही येत, तरी खचून जाऊ नये. कारण तुम्हांला माहित आहे आपण पडलो तरच उठू शकतो. आणि म्हणूनच अपयशाला सुद्धा समोर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि आपल्याला जास्तीत जास्त यश कसे संपादन करता येईल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचार, प्रचंड निर्धार आणि आत्म विश्वासाची जोड असणे आवश्यक आहे. तरच आपण जीवनाच्या परीक्षेत पास होऊ शकतो.

“एकंदरीत काय तर जीवन रुपी सागरात सुख दुःखाच्या लाटा झेलत कठीण प्रसंगांना तोंड देत

सामोरी जाऊन जिकंण्याची आशा म्हणजे जीवन ….

 

  -सौं. सरोज वि. हिवरे संयाेजिका काव्यकुंज

सहकार नगर रामपूर राजुरा

जिल्हा चंद्रपूर..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here