महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री चक्क ग्रामसेवक..

0
579

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री चक्क ग्रामसेवक....

सी बी एस सी बोर्डच्या तिसरीच्या पुस्तकातील प्रताप…

 

 

अहमदनगर
संगमनेर…प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील
पाठयपुस्तकात अनेकदा चुकीचे संदर्भ देत धडे प्रकाशित झाल्याचे अनेक किस्से असून ते वादात सापडल्यानंतर बदलावे लागले आहेत. असाच एक नवा धडा सीबीएसई ने गिरवण्याचा प्रकार केला असून त्यावर सध्या एकीकडे टीका होत असताना खमंग चर्चा पण होत आहेत.

सीबीएसईने राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा फोटो चक्क ‘ग्रामसेवक’ म्हणून छापला आहे. सीबीएसई च्या इयत्ता तिसरीच्या पुस्तकात पान क्रमांक ७० वर हा फोटो छापण्यात आला असून ग्रामपंचायतचे महत्त्व या धड्यात सांगण्यात आले आहे.

सीबीएसईच्या या अजब कारामाती नंतर आता वेगवेगळ्या पातळीवर प्रतिक्रिया व्यक्त होत असून सीबीएसईचा एकूण कारभार चव्हाट्यावर आला आहे.

सीबीएसईने इयत्ता तिसरीच्या सोशल स्टडिज या पुस्तकात एका धड्यामध्ये ग्रामपंचायतीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना विषय सोपा व्हावा यासाठी मंत्री सतेज पाटील हे ग्रामसेवक असल्याचे फोटोच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. फोटो छापण्यापूर्वी तो नेमका कोणाचा आहे ? त्यामागचा संदर्भ काय आहे ? याची तपासणी कोणी का केली नाही, असा सवाल आता विचारण्यात येत आहे. तसेच ही चूक लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणीसुद्धा केली जात आहे.

मंत्री सतेज पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव आहे. पाटील हे कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्याच बरोबर ते कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत. सध्या राज्याचे गृहराज्यमंत्री या पदावर ते आहेत. सतेज पाटील हे पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे पुत्र आहेत. 2004 मध्ये त्यांनी करवीर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते दिग्विजय खानविलकर यांना पराभूत केलं होतं. तसेच पुढे 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. 2009 च्या काँग्रेस राष्ट्रवादी सराकरमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलेलं आहे. सध्या महाविकास आघाडी सरकार मध्ये ते राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत. असे असताना सीबीएसई च्या अभ्यासक्रमातील धड्यात त्यांचा ग्रामसेवक उल्लेख चर्चेचा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here