न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन प्रथा बंद करा!

0
611

न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन प्रथा बंद करा!

चंद्रपूरच्या जिल्हाधिका-यां मार्फत राज्यपाल यांना नवएकता जय सेवा बहुउद्देशिय संस्थेचे निवेदन!

चंद्रपूर -किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी

न्याय प्रिय महात्मा राजा रावण यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन प्रथा बंद करावी अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील नवएकता जय सेवा बहुउद्देशिय संस्था चांदागड यांनी आज सोमवार दि.१९आँक्टाेबरला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे मार्फत महामहिम राज्यपाल यांचे कडे एका लेखी निवेदनातुन केली आहे . सम्रूध्द संस्क्रूतीचा वैभवशाली वारसाच्या अविस्मरणीय सर्वोच्च गुणांचा परिपाक म्हणजे महात्मा राजा रावण हाेत असा प्रामुख्याने सादर केलेल्या निवेदनात (त्यांचा) उल्लेख केला आहे .मुलनिवासी गाेंड संस्क्रूतिचे श्रध्दास्थान व प्रेरणास्थान असलेल्या न्याय प्रिय महात्मा राजा रावण यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यांचा जर (दस-याचे दिवशी) काेणी प्रयत्न केला तर तमाम मुल निवासी संघटनांव्दारे त्याचा जाहिर रित्या तीव्र स्वरुपात निषेध व्यक्त करण्यांत येणार असल्याचे शेवटी निवेदनात नमुद करण्यांत आले आहे . सदरहु निवेदनाच्या प्रति महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ,आदिवासी विकास मंत्री ,पालकमंत्री ,व जिल्हा पाेलिस अधिक्षक यांना पाठविण्यांत येणार असल्याचे नवएकता जय सेवा बहुउद्देशिय संस्था चांदागडच्या एका पदाधिका-यांने आज या प्रतिनिधीस चंद्रपूर मुक्कामी सांगितले.चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करतांना राकेश तिरानकर ,मनाेज चांदेकर , देविदास किवे ,दीपक पेंदाेर , विकास मेश्राम ,राकेश तिरानकर आदि उपस्थित हाेते . न्याय प्रिय महात्मा राजा रावण दहन भुमिवर गाेंगाे (पुजा)करण्याची परवानगी देण्यांत यावी अशी मागणी सुध्दा नवयुवा जयसेवा पेंरसाेपन आदिवासी मंडळ घुग्गुस , जयसेवा आदिवासी मंडळ उसगाव , नवयुवक आदिवासी संस्था म्हातारदेवी ,व क्रांतिसुर्य भगवान बिरसा मुंडा यांनी याच सादर केलेल्या निवेदनातुन केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here