तिन वर्षांपासूनची कोठारी ग्रामपंचायत झाली प्रभारी मुक्त

0
900

तिन वर्षांपासूनची कोठारी ग्रामपंचायत झाली प्रभारी मुक्त

कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी रुजू 
प्रलंबित समस्या सोळविण्याचे नव्या अधिकाऱ्यां पुढे आव्हान

प्रतिनिधी : राज जुनघरे

बल्लारपूर : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोठारी ग्रामपंचायतीचा कारभार मागील तीन वर्षांपासून प्रभारी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या भरवशावर चालत असल्याने ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांच्या समस्यांचा डोंगर उभा झालेला आहे. प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे कुरण ठरली होती. त्यामुळे कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्या जात होते. तिन वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता कुठे कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने बल्लारपूर तालुक्यातील बलाढ्य ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रभारातुन मुक्त झाली असून नव्या ग्रामविकास अधिकाऱ्यां पुढे तिन वर्षात निर्माण झालेल्या उग्र समस्या व भ्रष्टाचाराने माखलेली दलदल सांभाळने हे एक आव्हान ठरणार आहे.

 

 

कोठारी गाव तालुका निर्मितीच्या उंबरठ्यावर आहे. स्थानिक लोकसंख्या जवळपास पंधरा हजारांच्या परिघात येत असून लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे विकासाच्या बाबतीत मागासलेला आहे. मागिल तिन वर्षांपासून ही ग्रामपंचायत प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर होते. राजकीय आकसापोटी कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी “पिंपळशेंडे” यांची नियुक्ती करण्यात आली होती. राजकीय हस्तक्षेप करून विसापूर येथिल अधिकारी पोवरे यांना कोठारीचा प्रभार सोपविल्या गेला. आणि पिंपळशेंडे यांना विसापुर येथिल प्रभार देण्यात आला. तब्बल तिन वर्षे पोवरे यांनी कोठारीचा प्रभार सांभाळला. तदनंतर पोवरे यांची प्रशासकीय बदली झाली. तो प्रभार दहेली येथिल ग्रामसेवक परसुटकर यांचेकडे आला. स्थानिक लोकप्रतिनिधिंचे उदासीन धोरण व प्रभारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित पणामुळे ग्रामपंचायत मध्ये समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे.

 

 

अनेक नागरिकांचे फेरफार प्रकरणे निकाली न काढल्यामुळे घरकुलाचे प्रकरणावर विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासकीय निधी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला असताना नियोजन शुन्यतेमुळे कामे रखडली असून निधी धुळ खात पडलेला आहे. सामान्य फंडाची वसुली योग्य प्रमाणात होत असुन सुद्धा बॅंक खात्यात ठणठणाट आहे. नियमित ग्रामविकास अधिकारी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना अत्यावश्यक कामे करुन घेण्यासाठी ताटकळत बसावे लागते. त्यातच प्रभारी अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत ग्रामपंचायत भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे. एक ना अनेक समस्यांचे माहेरघर ठरलेल्या ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी अभय धवणे रुजू झाले असून त्यांना प्रलंबित समस्या सोडविण्याचे आव्हान ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here