सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयातून निकिता काळे महाविद्यालयातून प्रथम

0
724

सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयातून निकिता काळे महाविद्यालयातून प्रथम

कोरपना/ प्रवीण मेश्राम
बऱ्याच दिवसापासून वर्ग बारावीचे विद्यार्थी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत होते. आगस्ट महिन्याच्या तीन तारखेला महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने वर्ग बारावीचा निकाल घोषित करून विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला पूर्ण विराम दिला आहे.
गडचांदुर शहरातील सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयातील कला विभागाचा निकाल 100% लागला असून एकूण 26 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर 107 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
महाविद्यालयातील कु. निकिता काळे या विद्यार्थिनी ने प्रथम क्रमांक पटकावला असून तिला 600 पैकी 534 गुण प्राप्त झाले असून तिच्या गुणांची टक्केवारी 89% एवढी आहे. महाविद्यालयातील कु. संजीवनी ठमके ह्या विद्यार्थिनीने 87% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर स्वप्नील चिडे या विद्यार्थ्याने 83.50% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
महाविद्यालयातील विज्ञान विभागाचा निकाल 100% लागला असून 26 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत तर 25 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. विज्ञान विभागातील कु. साधना साईनाथ शेरकी हिने 81.34 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला असून कु. प्रचिता बंडू सिडाम ह्या विद्यार्थिनीने 81.33 टक्के गुण तर कु. साक्षी अनील चहारे ह्या विद्यार्थिनीने 80.17 गुण प्राप्त करून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
महाविद्यालयातील व्यवसाय शिक्षण विभागाचा निकाल 100 टक्के लागला असून तुषार जोंधळे, कु. श्रुती पाकलवार व रजनीश गाडगे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य, पर्यवेक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here