तालुक्यात डेंग्यूसदृश्य आजाराचे थैमान

0
569

प्रतिबंधात्मक उपायांवर आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

 

प्रतिनिधी/आशिष गजभिये

चिमूर

तालुक्याच्या परिसरात डेंगूसदृश्य आजाराने थैमान घातले असून या आजराच्या प्रतिबंधात्मक उपाय-योजना कडे तालुका प्रशासन व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

 

तालुक्यातील रुग्णालयात मागील काही दिवसांपासून ज्वराच्या रुग्णांची संख्या लक्षणीय होत आहे.वातावरण बदल,,गावा-गावातील अस्वच्छता या मुळे तालुक्यातील डेंगूसदृश्य रुग्ण वाढीस बघावयास मिळत आहे.शासकीय रुग्णालयात जाण्याऐवजी रुग्ण व कुटूंबीय खासगीत उपचार घेत असल्याने तालुका आरोग्य विभागाकडे प्रत्यक्ष किती रुग्णांना डेंग्यू ची लागण किती संशयित याची ठोस माहिती उपलब्ध नाही आहे.

 

आरोग्य यंत्रणा सक्षमपणे ग्रामीण भागात पोहचत नसल्याने नागरिक या साथरोगापासून अनभिज्ञ असल्याचे चित्र तालुक्यात आहे. गावागावात या साथरोगाची जागृती व प्रतिबंधात्मक उपाय योजना तातडीने करण्याची गरज आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाला आहे.

 

 

*डेंगूसदृश्य रुग्णाचा मृत्यू ?*

 

तालुक्यातील पांढरपौनी येथील पोलीस पाटील प्रफुल वसंता रामटेके (३५) हे मागील काही दिवसापासुन ज्वरामुळे खासगीत उपचार घेत होते.मंगळवारी सकाळी चंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल होण्या करीता जात होते दरम्यान वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. आकस्मिक पने युवा इसमाच्या मृत्यूने समाजमन हळवले. डेंगू आजाराने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा नागरिकांत सुरू होती. या बाबत वैद्यकीय अधिकारी निखिल कामडी यांना विचारणा केली असता ते उपचार्थ दवाखान्यात दाखल झाले नसल्याने मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती नसल्याचे सांगितले.

 

तालुक्यातील ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेने प्रतिबंधात्मक फवारणी करून या आजाराची जनजागृती करावी.तपासणी करीत तालुक्याच्या ठिकाणी पायपीट करावी लागते या मुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी तातडीने तपासणी सोय उपलब्ध करावी.”

आदित्य वासनिक 

उपसरपंच, ग्रा.प.शिवापूर(बंदर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here