गोंडपिपरी तालुक्यात २९८ जागेसाठी ४३०८० मतदान

0
503

गोंडपिपरी तालुक्यात २९८ जागेसाठी ४३०८० मतदान

८५.९३ टक्के मतदान

७५१ उमेदरवारांचे भाग्य मशिनबंद

गोंडपिपरी(सुरज माडुरवार)

तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूक घोषित झालेल्या ४३ ग्रामपंचायतींपैकी चेकबेरडी गावातील नागरिकांसह उमेदवारांनी निवडणुकीपासून दुर राहात गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पक्षभेद मतभेद आणि गट-तट विसरून एकत्र येत सर्व ७ सदस्यांची बिनविरोध निवड केली.
४३ ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत ७ सदस्यीय चेकबेरडी ग्रामपंचायत अविरोध झाल्यामुळे ४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आज संपन्न झाल्या .सदर निवडणूक ३३७ जागेसाठी होती त्यात ८४९ उमेदवार रिंगणात उभे होते त्यापैकी ५९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.चेक बेरडी येथील ७ उमेद्वारांसह सह तालुक्यातील एकंदरीत ३९ उमेदवार बिनविरोध निवडून आले.२९८ जागेसाठी आज प्रत्यक्ष मतदान झाले. ७५१ उमेदवार आपले भाग्य आजमावनार आहेत.
निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गोंडपिपरी तालुक्यात प्रत्यक्ष मतदान झालेल्या ४२ ग्रामपंचायतींमध्ये ८५.९३ टक्के मतदान झाले आहे.यात स्त्रिया १९७६७,पुरुष २३३१३ यांनी मतदान केले असून ऐकून टक्केवारी ८५.९३ आहे.तालुक्यात सर्व ठिकाणि शांततेत निवडणुका पार पडल्या.धाबा,भं तळोधी,तारडा,करंजी या ठिकाणी पैशाचा घोडेबाजार चालला असून.सर्वांचे लक्ष तालुक्यातील धाबा,भं तळोधी,करंजी ग्रामपंचायत कडे लागले आहे.एकंदरीत कुणाचे गणित जमणार,कुणाचे बिघडणार १८ ला स्पष्ट होणार असून.तालुक्यातील जनतेचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here