क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके म्हणजे क्रांतीची मशाल – आ. किशोर जोरगेवार

0
413

क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके म्हणजे क्रांतीची मशाल – आ. किशोर जोरगेवार

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन

 

आदिवासी समाजाच्या सन्मासाठी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांनी ब्रिटिशांविरोधात लढा उभारला पूढे हाच लढा चंद्रपूरच्या स्वातंत्रलढ्यात परिर्वतीत झाला. चंद्रपूर जिल्ह्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अमर शहिद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचे बलिदान विशेष महत्वाचे आहे, ते क्रांतीचे मशाल होते. असे भावोद्गार आमदार किशोर जोरगेवार यांनी राष्ट्रीय योद्धा क्रांतिवीर शहीद बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या जयंती निमित्य त्यांना अभिवादन करतांना काढले.
क्रांतिवीर शहिद बाबूराव शेडमाके यांच्या जयंती निमित्य जिल्हा कारागृहातील शहिद स्मारकास आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवादन केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाप्रमूख जितेश कुळमेथे, आदिवासी विभागाच्या महिला शहर प्रमुख वैशाली मेश्राम, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युथ शहर प्रमुख कालकार मल्लारप, आदिजन चेतनेचा जागर संस्थेचे अध्यक्ष अशोक तुमराम, अशोक उईके, विरेन्द्रशहा आत्राम,एकनाथ कन्नाके, अनिल सुरपाम, बाबुराव जुमनाके, कृष्णा मसराम, दयालाल कन्नाके, अॅड. भय्याजी उईके, नितीन शाहा, चंद्रशेखर देशमुख, आदिंची उपस्थिती होती.
क्रांतिवीर शहिद बाबूराव शेडमाके यांची समाजाबद्दल कौतुकाची भावना होती, आदिवासींचा जमीनीवर हक्क आहे आणि तो त्यांना मिळायला हवा. असा निर्धार क्रांतिवीर शहिद बाबूराव शेडमाके यांनी घेतला होता. यातूनच त्यांच्या मनातील बंडखोरीची ज्योत प्रज्वलित झाली आणि त्यांनी मृत्यूपर्यंत इंग्रजांशी लढा देऊन आपल्या लोकांचे रक्षण करण्याचा संकल्प केला. त्यांनी ‘जंगम सेनेची ची स्थापना केली. पूढे याच सेनेने ब्रिटिशांविरोधात लढा उभारला. त्यांनी त्याकाळी समाज आणि पर्यायाने देशासाठी दिलेले योगदान नेहमी स्मरणात राहणार. असेही ते यावेळी म्हणाले.
या प्रसंगी हरमन जोसेफ, नितेश गवळे, प्रविण मेश्राम, सिध्दार्थ मेश्राम, सतिश सोनटक्के, प्रदिप गेडाम, मधूकर कोडापे, सुरज गावळे, किशोर पेंदे, अनिरुध्द धवने, अजय मेश्राम, वामन गणवीर, चरणदास भागत, पुरषोत्तम सोयाम, रंजना किन्नाके, सोनू चांदेकर, जमुना तुमराम, प्रदिप गेडाम, रुपेश मुलकावार, नरेश आश्राम, रवि मसराम, सुनिल मेश्राम, सारंग कुंभरे, पलाश पेंदाम, शुभम मडावी, लोमेश मडावी, यांच्या सह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची व आदिवासी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here