सांस्कृतिक व क्रिडा महोत्सव

108

सांस्कृतिक व क्रिडा महोत्सव

चंद्रपूर येथे महोत्सव घेण्याची संकल्पना मनपा आयुक्त विपीन पालीवाल, आयुक्त चंद्रपूर महानगरपालिका यांनी मांडली होती. घुग्घुस, गडचांदूर, राजुरा, वरोरा, भद्रावती, चिमूर, ब्रम्हपुरी, जिवती,सावली,कोरपना,पोभूर्णा, भीसी,गोडपिपरी, मुल, बल्लारपूर, नागभीड व मनपा चंद्रपूर येथील कर्मचार्यांनी स्पर्धेत भाग घेतला मुख्यधिकारी यांच्या नेतृत्वात विविध न.प.च्या कर्मचार्यांनी सदर स्पर्धेत न.प.गडचांदूर चमू द्वारे सादर करण्यात आलेल्या अफजल खानाचा वध या पोवाडा करिता नगरपरिषद गडचांदूर प्रथम क्रमांकाचे ठरले तसेच एकल नृत्य द्वितीय क्रमांक, सामूहिक गायन तृतीय क्रमांक, चेस द्वितीय क्रमांक व कॅरम डबल द्वितीय क्रमांक प्राविण्य प्राप्त केले. मा.मुख्यधिकारी ड्रा.विशाखा शेळखी यांच्या मार्गदर्शनात न.प.गडचांदूर टीमने याकरिता विशेष परिश्रम घेतले.अशा प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात यावे अशी भावना कर्मचार्यांनी व्यक्त केली.पुढील वर्षी होण्याच्या कार्यक्रमाचे यजमानपद न.प.भद्रावतीने स्वीकारले आहे.

समारोप प्रसंगी संघमित्रा ढोके, विभागीय सह आयुक्त, नगर प्रशासन, नागपूर विभाग, मा.श्री.अजितकुमार डोके, मा.श्री. विपीन पालीवाल, आयुक्त चंद्रपूर महानगरपालिका, मा.श्री. सुनील बल्लाळ, उपाध्यक्ष, शहरी प्रशाकीय सेवा संघटना (म.रा.) मुख्यधिकारी अजय पाटणकर, घुग्घुस न.प. मुख्यधिकारी जितेंद्र गादेवार, मुख्यधिकारी राहूल कंकाळ यांची विशेष उपस्थित होती, सदर कार्यक्रम यशस्वी होणे करिता समस्त मुख्यधिकारी व कर्मचारी वृंद आदीने सहकार्य केले.

advt