युवा जोडो अभियानातंर्गत “युवा संवाद मेळावा आणि मुलाखती”

0
766

युवा जोडो अभियानातंर्गत “युवा संवाद मेळावा आणि मुलाखती”

वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश

 

चंद्रपूर/प्रतिनिधी, १४ ऑगस्ट : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रिय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सम्पूर्ण महाराष्ट्रात युवा आघाडी निर्माण करण्याचे कार्य जोमाने सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीची युवा कार्यकारिणी सम्पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून युवा आघाडीची पूर्ण कार्यकारिणी चंद्रपुर ला येत आहे. एन डी हॉटेल, नागपूर रोड, चंद्रपूर येथे १६ ऑगस्ट ला सकाळी ११ वाजता युवा संवाद मेळावा व मुलाखती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

 

ह्या युवा संवाद मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी निलेशभाऊ विश्वकर्मा, प्रदेश अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी हे राहतील तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रामुख्याने युवा आघाडीचे प्रदेश युवा महासचिव राजेंद्रजी पातोडे आणि युवा पदाधिकारी प्रदेश सदस्य एड सचिन जोरे, अक्षय बनसोडे, शामिभा पाटील, चेतन गांगुर्डे, विशाल गवळी, विश्वजित कांबळे, ऋषिकेश नांगरे पाटिल, रविकांत राठोड, सूचित गायकवाड, अमन शादाब धांगे प्रामुख्याने उपस्थित असतील.

 

 

तर प्रमुख उपस्थिति म्हणून राज्य कार्यकारिणी सदस्य कुशलभाऊ मेश्राम, विदर्भ समन्वय समितीचे मुख्य समन्वयक डॉ.रमेशकुमार गजबे, विदर्भ समन्वयक अरविंदभाऊ सांदेकर, राजूभाऊ झोडे, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष प्रवीण गावतुरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कविताताई गौरकर, शहर अध्यक्ष बंडूभाऊ ठेंगरे, शहर महिला अध्यक्ष तनूजाताई रायपूरे उपस्थित राहणार आहेत.

 

 

जिल्हा शहरा मध्ये सकाळी पत्रकार परिषद, त्यानंतर मोटरसायकल रॅली काढून सभा/संवाद मेळावा संपताच इच्छूकाच्या मुलाखती घेतल्या जातील. सदर युवा मेळाव्यास चंद्रपुर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन वंचित बहूजन आघाडी चंद्रपुर चे जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here