जनावरांचे मांस वाहतूक करणारा ट्रक पकडला

0
160

जनावरांचे मांस वाहतूक करणारा ट्रक पकडला

बल्लारपूर पोलिसांची मोठी कारवाई

नागपूर कडून हैद्राबादला जात होता ट्रक

विसापूर : एका आयशर ट्रक मध्ये जनावरांचे मांस भरून तो ट्रक तेलंगणातील हैद्राबाद कडे जात होता.दरम्यान तो ट्रक विसापूर टोल नाक्यावर बंद पडला.याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता,त्यात जनावरांचे मांस आढळून आले. ही घटना शुक्रवारी ( दि.१९ ) सकाळी ११ वाजता दरम्यान उघडकीला आली. याप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बल्लारपूर पोलिसांची ही मोठी कारवाई आहे.
नागपूर येथून हैद्राबाद कडे आयशर ट्रक क्र. एम.एच.४०/ सी.टी.९०९१ जनावरांचे मांस घेऊन जात होता.हा ट्रक चंद्रपूर – बल्लारपूर मार्गांवरील विसापूर टोल नाक्यावर अचानक बंद पडला.यावेळी ये – जा करणाऱ्या प्रवाशांना मासांची दुर्गंधी जाणवली.याची माहिती बल्लारपूर पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पथक पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वात घटनास्थळी तातडीने दाखल झाले.
त्यावेळी ट्रक चालकासह अन्य लोकांनी तेथून पळ काढला.पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन झडती घेतली.तेव्हा पोलिसांना जब्बर धक्का बसला.ट्रक मध्ये जनावरांचे मांस आढळून आले. टोल नाक्यावर वजन केले ,असता ट्रकमध्ये दोन ते तीन टन मांस असल्याचे प्राथमिक अंदाजात दिसून आले.तो ट्रक पोलिसांनी दुसऱ्या वाहनाच्या साहाय्याने घनकचरा व्यवस्थापन केंद्राकडे नेला.जनावरानाच्या मासाचे नमुने पोलिसांनी प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. उर्वरित मांस नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण तळी व हुशेन शहा यांच्या पथकाने केली.

“नागपूर कडून ट्रक हैद्राबाद कडे जनावरांचे मांस घेऊन जात होता.ही माहिती मिळताच आमचे पथक विसापूर टोल नाक्यावर गेले.त्याच वेळी नादुरुस्त ट्रकचे काम करणारे व चालक घटनास्थळावरून पसार झाले.पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ट्रक मधील जनावरांचे मांस नष्ट करण्यात आले.काही मासाचे नमूने घेऊन न्यायालयीन प्रक्रियेनुसार तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.” – उमेश पाटील,पोलीस निरीक्षकब ल्लारपूर ठाणे, बल्लारशाह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here