आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते कविटपेठ येथे १० लक्ष रुपयांच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन…

0
169

आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते कविटपेठ येथे १० लक्ष रुपयांच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन…

 

राजुरा, २१ जाने. : ग्रामीण भागात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आज राजुरा तालुक्यात विविध ठिकाणी ६५ लक्ष रुपयांच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यातील कविटपेठ येथे तुळशीराम आत्राम ते महादेव देठे यांच्या घरापर्यंत १० लक्ष रुपयांच्या सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामाचेही भूमिपूजन आमदार धोटे यांच्या हस्ते आज दुपारी पार पडले.

आज आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते तालुक्यातील सुब्बई येथे सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम व इंदिरानगर (सुब्बई) येथे सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम १५ लक्ष रुपये, धानोरा येथे सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम १५ लक्ष रुपये, मूर्ती येथे सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम १५ लक्ष रुपये, ग्रामपंचायत कोष्टाळा अंतर्गत घोट्टा येथे सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम १० लक्ष रुपये व कविटपेठ येथील सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम १० लक्ष रुपये असे एकूण ६५ लक्ष रुपयांच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार धोटे यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या राजुरा तालुक्यातील विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. कविटपेठ येथील भूमिपूजन सोहळ्याला गावच्या सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार धोटे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here