अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार

0
889

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार

* कोठारी, आक्सापुर राज्य महामार्गावरील घटना |
* वन्यप्राण्यांच्या भ्रमन मार्गाची सुरक्षा ऐरणीवर |

 

राज जुनघरे
बल्लारपूर (चंद्रपूर):– नुकतेच घोषित करण्यात आलेल्या कन्हाळगाव अभयारण्याच्या कार्यकक्षेत येणाऱ्या झरण वनक्षेत्रातील कक्ष क्र. 123 दरम्यान व कोठारी, आक्सापुर राज्य महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट जागीच ठार झाला.
कन्हाळगाव अभयारण्य व सध्या अखत्यारीत असलेल्या वनविकास महामंडळाच्या झरण वनक्षेत्रातील जंगलाच्या मध्यभागातून बल्लारपूर,आष्टी नित्य वर्दळीचा राज्य महामार्ग जात असून याच क्षेत्रातून वन्यप्राण्यांचा भ्रमन मार्ग आहे. कोठारी ते आक्सापुर हे जंगल व्याप्त क्षेत्र असल्याने वन्यप्राण्यांचे अनेकदा अपघात घडले आहेत. 6 आक्टोंबर रोजी 4 वाजताचे दरम्यान झरण वनक्षेत्रातील कक्ष क्र.123 नियत क्षेत्रात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाल्याने वनवर्वतूळात एकच खळबळ उडाली. नुकतेच कन्हाळगाव अभयारण्याची राज्य शासनाकडुन घोषणा करण्यात आली आहे. वनविकास महामंडळा कडून जंगल हस्तांतरणाच्या हालचाली सुरू असतानाच ही घटना घडल्याने मोठ्या प्रमाणात संचार असलेल्या वन्यप्राण्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. जंगलाच्या मध्यभागातून राज्य महामार्ग जात असून वन्यप्राण्यांच्या भ्रमन मार्गाचे नियोजन करणे संबंधित विभागाला कसरतीचे ठरणार आहे हे मात्र विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here