चंद्रपूरात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती !कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळीची उपस्थिती !

0
458

चंद्रपूरात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती !कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळीची उपस्थिती !

🟣🌼चंद्रपूर🟨☀️🌼🌼🌀किरण घाटे🟨🟢 राजमाता ग्रुप व साईबाबा बहुउद्देशिय संस्थेच्या संयुक्तिक विद्यमाने येथील मंदीर वार्ड परिसरातील विठ्ठल मंदीर स्टेडीमय मध्ये रविवार दि.3 जानेवारीला क्रांति ज्याेती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला. 🟢🟣🌀याच दिनाचे औचित्य साधुन विविध स्पर्धा व इत्तर अनेक सांस्क्रूतिक कार्यक्रमाचे सकाळपासुन तर रात्री उशिरा पर्यंत आयोजन करण्यांत आले हाेते .🟥🟩🔶🟡 सदरहु कार्यक्रमाचे उद्घाटन गडचांदूर मजदुर युनियन सिमेंटचे बी. डी. सिंग यांचे शुभ हस्ते झाले .🟥☀️💠🌼या वेळी प्रमुख अतिथी म्हणुन डॉ़ .पालीवाल प्रा.निलेश बेलखेडे ,वर्षा कोठेकर, अक्षय आंबिरवार,अतुल ठाकरे, सह शहरातील अनेक प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित हाेती. 🟥🟩🔶🟢सदरहु कार्यक्रमाच्या यशस्वि करीता राजमाता संस्थेच्या अध्यक्षा प्रगती पडगेलवार, इत्तर पदाधिकारी व सदस्यगण तथा साईबाबा संस्थेच्या नंदाताई अल्लुरवार यांनी अथक परिश्रम घेतले .सांस्क्रूतिक स्पर्धेतील प्रथम विजेता पारितोषिक सी सेवन ग्रुपला मिळाले.द्वितीय पारितोषिक हे संयुक्तिकरित्या देण्यात आले .त्यात अनुष्का चोैहानचा समावेश आहे . तृतीय बक्षिस प्रतीक्षा बावणे यांना देण्यात आले. या शिवाय गायन स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्रशांत शामकुवर, द्वितीय पारितोषिक कुमोद रायपुरे, मोणाक्षी यादव तर तृतीय पारितोषिक शुभम लोखंडे यांना देण्यात आले. उर्वरीत स्पर्धंकांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.हे सर्व कार्यक्रम काेराेनाचे सारे नियम पाळत पार पडले .पार पडलेल्या कार्यक्रमांना नागरिकांची गर्दी हाेती 🟥🟡🟣विशेषता महिलांची उपस्थिती लक्षणिय हाेती .🟣💠🟢🟡न्रूत्य स्पर्धेत छाेट्यांचा उत्साह अधिक दिसून आला .संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी राजमाता व साईबाबा संस्थेच्या पदाधिका-यांचे योगदान महत्वाचे राहिले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here