कोळशी येथील बोगस आश्रमशाळेची मान्यता रद्द करा

0
910

कोळशी येथील बोगस आश्रमशाळेची मान्यता रद्द करा

समाजकल्याण आयुक्ताच्या आशीर्वादाने शाळा विकली

 

कोरपना, प्रतिनिधी

कोडशी : कोरपना तालुक्यातील कोडशी खुर्द येथे सोहेल शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा स्व. चमनसेठ प्राथमिक आश्रम शाळा चालविली जात होती. ७ विद्यार्थी हजर असताना ७१ विद्यार्थ्यांची बोगस हजेरी पटसंख्या दाखवून अनुदान उचलण्याचा गोरखधंदा समाजकल्याण आयुक्तांच्या आशीर्वादाने चालु होता. या शाळेची मान्यता रद्द करून कारवाई करणे अपेक्षीत असतांना आता चक्क ही शाळाच विकली गेली असून तसाच भोंगळ कारभार चालु असून शासनाची फसवणूक करून अनुदान लाटण्यात येत असल्याने शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी गजानन बोरडे, नारायण डोहेसह गावकर्‍यांनी केली आहे.
पूर्वीची स्व. चमनसेठ प्राथमिक आश्रमशाळा हस्तांतरण करुन स्व. नारायणराव ठमके प्राथमिक आश्रमशाळा झाली आहे. शासन नियमानुसार कुठल्याही सोयीसुविधा नाही. शिक्षक नाही विद्यार्थी नाही. आश्रम शाळेत अनुचित गैरप्रकार सुरु आहे. स्व. चमनसेठ प्राथमिक आश्रम शाळेने बोगस पटसंख्येच्या आधारावर अनुदान लाटून शासनाची फसवणूक केल्याने मान्यता रद्द करून गुन्हा दाखल केला पाहीजे होता. परंतु सदर शाळेच्या हस्तांतरणाला समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्याचा आधार काय ?
समाजकल्याण विभागाचा भ्रष्ट कारभारामुळेच सर्व काही घडून आले आहे. या आश्रमशाळांची मान्यता रद्द करून चौकशी करण्याची कारवाई करण्याबाबतचा ठराव कोळशी ग्रामपंचायतीने समाजकल्याण आयुक्तांना पाठविला असून गजानन बोरडे, नारायण डोहे, संदीप ताजणे, प्रवीण टोंगें यांनी येथील गैरप्रकाराबाबत मंत्रिमहोदयांकडे तक्रार करुन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

समाजकल्याण विभागाचा भ्रष्ट कारभार

३ वर्षांपूर्वी आम्ही कोळशी येथील स्व. चमनसेठ या आश्रम शाळेत ७ मुलाची उपस्थिती असतांना ७१ मुलांची बोगस हजेरी लावून अनुदानाची उचल करुन शासनाची आर्थिक फसवणूक केली जात असल्याने सोहेल शिक्षण प्रसारक मंडळ यांचे व्यवस्थापनासह तत्कालीन समाजकल्याण आयुक्त कुळकर्णी यांचेवर कारवाईची मागणी केली होती. समाजकल्याणमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने येथील बोगस पटसंख्या दाखविणार्‍या शाळेची मान्यता रद्द करण्याऐवजी शाळा परस्पर विकण्यात आली आहे. मोठा भ्रष्टाचार झाला आहे. येथील शाळेची मान्यता रद्द करून कारवाई करावी.
अभय मुनोत, नांदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here