विट्ठलवाडा येथील वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह

0
899

विट्ठलवाडा येथील वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह

गोंडपिपरी(सूरज माडूरवार)

तालुक्यातील विट्ठलवाडा येथील विट्ठल परशुटकर वय ( 65 )वर्ष यांचा दि 14 बुधवारला रात्री विहिरीत मृतदेह आढळला आणि खळबळ उडाली.
विट्ठल परसूटकर हा गावातीलच एका शेतकऱ्यांकडे सालगडी राहून त्यांच्या शेतीचे काम पाहत होता.बुधवारी दुपारच्या सुमारास बैलांना पाणी पाजण्यासाठी म्हणून शेतात गेला .संध्याकाळ झाली तरी घरी परतला नसल्याने घरच्यांनी त्यांचा शोध सुरु केला.गावात कुठेच दिसत नसल्याने त्यांचा शोध शेत परिसरात जाऊन करण्यात आला असता एका विहिरी जवळ त्यांची पादत्राने आढळुन आली . पादत्राने विट्ठल पशूटकर यांची असावीत ह्या अंदाजावरून विहिरीत पाहणी केली असता विहिरीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने आणि रात्रीची वेळ असल्याने काहीच दिसत नव्हते. प्रसंगी टॉर्च लावून विहिरीत बघितले. पण काहीच दिसत नव्हतं! विहिरीत पाणी जास्त असल्याने विहिरीतिल पाणी मोटोरपम्पद्वारे बाहेर काढण्यात आले .विहिरीतिल पाण्याचे प्रमाण कमी होताच टॉर्च लावून पाहणी केली असता त्यांचा मृत्यूदेह दिसुन आला. लगेच
घटनेची माहिती गोंडपीपरी पोलीस स्टेशनला कळविण्यात आली असता घटनास्थळी पोलीस कर्मचारी हजर झाले .व गावकऱ्यांच्या मदतीने
त्याचा मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला .एका खाजगी वाहनात टाकून उत्तरनिय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे नेण्यात आले आहे.
सदर आत्महत्या नसून घातपात असावा अशी चर्चा परिसरात असून
पुढील तपास गोंडपीपरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात गोंडपीपरी पोलीस कर्मचारी सरजू कातकर, अमित गुरनुले करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here