नगरपालिका उपाध्यक्ष चे नाव फलका मध्ये नसल्यामुळे शहरात चर्चेला उधाण

0
648

नगरपालिका उपाध्यक्ष चे नाव फलका मध्ये नसल्यामुळे शहरात चर्चेला उधाण

कोरपना, ता.प्र.- – तालुक्यातील गडचांदूर शहरातील बापूराव शेडमाके चौक ते पिंपळगाव रोड ( कृषी उत्पन्न बाजार समिती) पर्यंत रस्त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला होता तेव्हा फलकाचे अनावरण करण्यात आले तेव्हा नगर परिषदेच्या अध्यक्षा आणि नगर सेविका यांचे नाव होते पण नगर परिषदेचे उपाध्यक्ष यांचे नाव नसल्याने शहरात आणि परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
सविस्तर गडचांदूर शहरात आमदार निधीतून शेडमाके चौक ते पिंपळगाव रस्त्या ( कृषी उत्पन्न बाजार समिती) पर्यंत रस्त्यासाठी ४२ लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी उपलब्ध करून देण्यात आला तरी दि. १२/०३/२०२१ रोजी भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला होता तेव्हा भूमीपूजनाच्या फलकावर आमदार सुभाष धोटे, शहरातील प्रथम नागरिक नगर परिषदेच्या अध्यक्षा सविता टेकाम आणि नगर सेविका अर्चना वांढरे यांचे नाव दिसून आले मात्र नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी यांचे न दिल्याने शहरात उलट सुलट चर्चा करताना शहरातील नागरिक दिसतं आहे त्यामुळे शहरात नगर परिषदेमध्ये सत्यता तर कांग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असून सुद्धा कांग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काही राजकीय व्देशापाई तर नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी यांचे नाव फलकावर लावण्यात आले नाही असे चित्र सध्या शहरातील जनतेच्या मनात घर करून बसले आहे.
उद्घाटनाच्या फलकावरून उपाध्यक्षांचे नाव गायब का झाले? नगर परिषदेच्या सत्तेमध्ये तर हातात हात घालून बसले आहे? पण विकास कामांच्या फलकावरून उपाध्यक्षांचे नाव गायब का? असे एक ना अनेक प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झाले आहे त्यामुळे शहरातील चौकाचौकात आणि काही जानकर यांच्या कडून होणाऱ्या चर्चेतून दिसून येत आहे की शहरातील विविध विकासकामांचे श्रेय फक्त आणि फक्त कांग्रेस पक्षाच्या जनतेने निवडून दिलेल्या नगर परिषदेच्या अध्यक्षा सविता टेकाम तर घेणार नाही ना अशी शंका कूशंका सध्या तरी शहरात सूरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here