पुसद येथे राष्ट्रीय किसान मोर्चा व विविध शेतकरी संघटना, सामाजिक संघटना द्वारे चक्का जाम आंदोलन

0
483

पुसद येथे राष्ट्रीय किसान मोर्चा व विविध शेतकरी संघटना, सामाजिक संघटना द्वारे चक्का जाम आंदोलन

*यवतमाळ जिल्हा प्रतीनीधि*

छत्रपति शिवाजी चौक, पुसद येथे राष्ट्रीय किसान मोर्चा व विविध शेतकरी संघटना, सामाजिक संघटना व राजकीय संघटनाच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. संयुक्त किसान मजदूर मोर्चा द्वारा दिनांक 6 फेब्रुवारी 2021 रोजी 12 ते 3 दरम्यान भाजप सरकार द्वारा पारीत तीन शेतकरी विरोधी काळ्या कायद्याच्या विरोधात व सरकारच्या शेतकरी-मजूर विरोधी नितीच्या विरोधात देशभरात चक्काजाम आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देत राष्ट्रीय किसान मोर्चाने देशभरात या आंदोलनास समर्थन व सक्रिय सहभाग देण्याचे जाहीर केले होते. त्या अनुसार राष्ट्रीय किसान मोर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन क्रांति मोर्चा, अंबेडकराइट पार्टी ऑफ इंडिया,एएमआयएमआय व विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या चक्काजाम आंदोलनामध्ये सामिल झाले होते.
या वेळी गणपत गव्हाळे (राष्ट्रीय किसान मोर्चा) अयूब खान तहसीन (राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा) सुभाष धुळधळे (भारत मुक्ति मोर्चा) नामदेव इंगळे (अंबेडकराइट पार्टी ऑफ इंडिया) अशोकबाबा ऊंटवाल (राष्ट्रीय कांग्रेस पक्ष) विश्वास लांडगे, उत्तम राठोड, केशवराव खंदारे, रामराव राठोड (स्वाभिमानी शेतकरी संघटना) सुभाष कांबळे, लक्ष्मण कांबळे बहुजन क्रांती मोर्चा,कृष्णा जाधव, अमजद खान,सय्यद सिद्दिकोद्दीन (एम आई एम) बंडू गंगावणे, संतोष पढघने (बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क) ,फिरोज खान एम आय एम, आकाश गडधने (भारतीय विद्यार्थी मोर्चा) आदीसह शेकडो शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी सदर आंदोलनामुळे काही वेळासाठी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here