मोठी दुर्घटना!!! नाल्यात ट्रॅक्टर गेली वाहून, राजुरा तालुक्यातील देवाडा येथील घटना ३ मृत, आईसह चिमुकलीचा करुण अंत

0
736

मोठी दुर्घटना!!!
नाल्यात ट्रॅक्टर गेली वाहून, राजुरा तालुक्यातील देवाडा येथील घटना

३ मृत, आईसह चिमुकलीचा करुण अंत

देवाडा (राजुरा), १३ जून : तालुक्यातील देवाडा येथून १ किमीच्या अंतरावर बंधाऱ्यावरून ट्रॅक्टर जात असताना अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहाने ट्रॅक्टर ला आपल्या कवेत घेतले. या मोठ्या दुर्दैवी घटनेत ट्रॅक्टरसह ६ जण वाहून गेले. यात आईसह चिमुकलीचा करुण अंत झाला. हि घटना आज 3 वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर घटना अशी की, मल्लेश शेंडे यांच्या शेतात ट्रॅक्टर ने काम सुरु होते. २ वाजेच्या आसपास पाऊस सुरु झाल्याने घराकडे जाण्यास निघाले. यावेळेस बाजूच्या शेतात कापूस बियाणे पेरणी करत असलेल्या महिलांना घेऊन ट्रॅक्टर गावाकडे निघाले. गिट्टी खद्दान च्या जवळ असलेल्या बंधाऱ्यावरून जात असताना अचानक वाढलेल्या पाण्याच्या भयानक प्रवाहाने ट्रॅक्टर पलटली व वाहून गेली. यात ट्रॅक्टर चालक सिंधी येथील रहिवासी राजू दमिलवार (३७), देवाडा येथील बापू कुळमेथे (२५) यांना दोरीच्या साहाय्याने पाण्याच्या प्रवाहून बाहेर काढण्यात आले. मल्लेश शेंडे यांचा पत्ता लागला नसून शोधाशोध सुरु आहे तर मृतक आई माधुरी विनोद वंगणे (३२) व चिमुकली लक्ष्मी (८) यांना घटनास्थळावर चिखलातून बाहेर काढण्यात आले. पुढील तपास राजुरा पोलीस करत असून देवाडा व परिसरात या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here