अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले ची संचालक मंडळाची आज १४ जून रोजी पत्रकार परिषद… 

0
829

अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले ची संचालक मंडळाची आज १४ जून रोजी पत्रकार परिषद… 

 प्रतिनिधी/ ज्ञानेश्वर गायकर.

अहमदनगर/संगमनेर :- अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले येथील संचालक मंडळ व अधिकारी यांच्या वर वारंवार पत्रकार परिषद घेऊन आरोप करणारे दशरथ सावंत , व बी जे देशमुख यांना योग्य उत्तर देण्यास कारखाना संचालक मंडळ व ऊस उत्पादक शेतकरी हे आज १४ जून रोजी पत्रकार परिषद घेणार असून , राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते व शरद पवार निकटवर्तीय , कारखाना उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर या पत्रकार परिषदे मध्ये काय उत्तर देतात या कडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

अगस्ती कारखाना हा अकोले तालुक्याची कामधेनू आहे. विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी कारखाना महत्वाचा भाग आहे. अनेक अडचणीतून हा कारखाना शरद पवार यांनी मधुकर पिचड, दादासाहेब रूपवते, भाऊसाहेब हांडे,यांनी स्थापन केला. अकोल्यात नवक्रांती ८० च्या दशकात सुरू झाली. भाऊसाहेब हांडे, दादासाहेब रूपवते यांनी हा कारखाना सुरू केला, त्याचा सुकानु मधुकर पिचड व सीताराम गायकर , कैलास वाकचौरे यांच्या हाती दिला. मध्यंतरी गोळीबार झाला , तिकांडे परिवारातील एक व्यक्ती मृत्यू पावली,तर अन्य दोघे अपंग झाले. अकरा अकरा संचालक विरोधी व सत्ता धारी यांचे निवडून आले, पिचड मंत्री होते, त्यांनी कारखाना ,विरोधी मंडळी कडे दिला. कसा बसा कारखाना एक वर्ष चालवला व कर्ज पुरवठा सुरळीत करण्यास तत्कालीन अध्यक्ष यांना अपयश आले. तालुक्याची कामधेनू असल्याने पुन्हा एकदा जनतेने कारखाना पिचड व गायकर यांच्या ताब्यात दिला, कैलास वाकचौरे यांनी काही काळ पूर्ण काम पाहून कारखाना सुरळीत चालविण्यास मदत केली. तेव्हा पासून आज पर्यंत कारखाना प्रगती करत आहे. पण काही लोकांना कारखाना ताब्यात घेण्याची इच्छा झाली , व कारखान्यावर आरोप चक्क मोठ्या पत्रकार परिषद घेऊन होऊ लागले. ही बाब पवार साहेब यांचे निकटवर्तीय सीताराम गायकर पाटील यांना व संचालक मंडळ यांना रुचली नाही , त्यांनी सौ सोनारकी ,एक लोहरकी या न्यायाने १४ जून रोजी पत्रकार परिषद बोलावली आहे. तालुक्याच्या कामधेनू वर नको ते आरोप वारंवार होत असताना , अकोल्यातील जनता चूप कशी बसणार. संचालक नसलेले पण कारखाना जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले काही शेतकरी ही या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. सीताराम पाटील गायकर हे ज्येष्ठ नेते आहेत, सहकार क्षेत्रात त्यांना पन्नास वर्षांचा अनुभव आहे. तालुक्यात एकमेव नेते आहेत की त्यांना सर्व पक्षीय कार्यकर्ते मान देतात. स्वतः तेच मैदानात उतरल्याने ते नक्की काय म्हणतात या कडे तालुक्याचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here