कामगाराचा मृत्युने अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मध्ये तणाव सदृश स्थिती

0
488

कामगाराचा मृत्युने अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मध्ये तणाव सदृश स्थिती

5 तासापासून मृतदेह गेट वर ताटकळत

39 वर्षाचा काळातील पहिला प्रकार प्रशासकीय भवनाच्या प्रवेश द्वाराजवळ मृतदेह

कोरपना प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर येथे ठेकदार पद्धतीने काम करीत असलेल्या कामगाराचा मृत्युने तणाव सदृश स्थिती निर्माण झाली आहे.

ईश्वर संभाजी शिरालाकर वय 53 वर्ष राहणार आवारपूर हे मागील अनेक वर्षापासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर येथे काम करीत होते.10 जून ला कामावर असताना अचानक खाली पडले. काही वेळाने सोबत काम करीत असलेल्या कामगार बांधवांना लक्षात येताच कंपनी प्रशासनाच्या दवाखान्यात हलवण्यात आले परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. तिथेही त्यांचा उपचार होत नसल्याने नागपूर येथे हलविण्यात आले परंतु तेथेही त्यांचे शरीर उपचाराला साथ देत नसल्याने तब्बल 11 दिवसांनी 21 जून ला त्यांची मयत झाली.

शिलारकर हे कामावर असताना त्यांचा अपघात झाल्याने त्यांच्या मृतदेह कंपनी गेटच्या समोर ठेवून कुटुंबीयांनी मुलाला नोकरी व दवाखान्याचा खर्च अशी कंपनी प्रशासनाला मागणी केली. परंतु चार तास उलटूनही कंपनी प्रशासनाची कसली सहानुभूती न दाखवता मृतदेह ताटकळत ठेवल्याने कामगार आक्रमक झाले असून कंपनी प्रशासनाच्या परिसरात तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

कंपनी प्रशासनाचा अडेलतट्टू भूमिकेने व चर्चेद्वारे कोणताही तोडगा निघत नसल्याने कामगार परिवारामध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.

कामगार आक्रमक झाले असून कंपनी प्रशासनाच्या परिसरात असलेले एडमिनिस्ट्रेटिव विभाग या कार्यालयासमोर कामगारांनी मृतदेह नेला असून कंपनी प्रशासन जोपर्यंत मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नसून कामगार हे कामावर जाणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.

39 वर्षाच्या काळात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विभाग या कार्यालयासमोर पहिल्यांदाच कामगार संघटनेने सुरक्षा कवच तोडून असा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने सकाळी साडेदहा वाजता पासून वृत्त लिहीपर्यंत मृत ईश्वर शिराळकर यांचे पार्थिव कंपनी व्यवस्थापनाच्या प्रशासकीय भवनाच्या प्रवेश द्वाराजवळ ठेवण्यात आल्याचे दिसले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here