मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात महर्षी वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी

0
372

मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात महर्षी वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी

 

 

घुग्गुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात रामायण महाकाव्याचे रचनाकार, आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती ढीवर भोई समाज बांधवासमवेत उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प व पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.

याप्रसंगी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले की महर्षी वाल्मिकी यांनी आपल्या लेखणीतून प्रभू रामाला घराघरात पोहोचविले. रामायणातल्या शिकवणी आजही समाजासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. आदर्श जीवन कसे जगले पाहिजे हे शिकण्यासाठी प्रत्येकाने वाल्मिकी रामायण वाचायलाचं हवे.

यावेळी वाल्मिकी ऋषी ढीवर भोई समाज संस्था घुग्घुसचे अध्यक्ष सतीश कामतवार, संजय तिवारी, माजी सरपंच संतोष नुने, संजय भोंगळे, बबलू सातपुते, दिलीप कांबळे, तुलसीदास ढवस, सिनु इसारप, मंगेश पचारे, सारंग कामतवार, विजय कामतवार, मारुती मांढरे, विशाल नागपुरे, शुभम चंदेल, सुनंदा लिहितकर, शितल कामतवर, उमेश दडमल,महेश बांदुरकर तसेच असंख्य समाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here