वंदे मातरम।। सप्रेम नमस्कार।।

0
443

वंदे मातरम।।
सप्रेम नमस्कार।।

पांढरकवडा प्रतिनिधि तनवीर शेख

पांढरकवड़ा :– भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष आकाश धुरड यांचे आज ” युवा संवाद ” दौऱ्या निमित्त स्थानिक विश्राम गृह येथे आगमन झाले।
त्यांच्या सोबत मंचकावर जिल्हा महामंत्री, युवा मोर्चा रोहित राठोड़, तालुका अध्यक्ष शंकर सामृतवार, शहर अध्यक्ष दिलीप मुथा, नगरसेवक बंटी जुआरे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रितेश बोरेले हे उपस्थित होते।
आकाश यांनी आपल्या युवा संवाद दौऱ्याचे महत्व युवकांना पटवून दिले, सध्या सुरु असलेल्या त्यांच्या कामां बद्दल माहिती देऊन, युवकांना प्रोत्साहित केले।।
कोणतेही काम करतांना, विशेषकर सामाजिक कार्य करतांना कोणत्या अडचणी येतात, त्यांना कश्या प्रकारे तोंड द्यावे या बद्दल सुद्धा त्यांनी मोलाचे मार्गदर्शन करुन, जिथे जिथे गरज पडेल तिथे मी तुमच्या सोबत उभा असणार, अशी ग्वाही सुद्धा दिली।।
भाजपा चे तालुका अध्यक्ष शंकर सामृतवार, शहर अध्यक्ष दिलीप मुथा, नगरसेवक बंटी जुआरे यांनी सुद्धा युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले।
भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रितेश बोरेले यांनी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश धुरड यांना संपूर्ण कामाचा आढावा दिला आणि जिल्ह्याच्या मार्गदर्शनात येणारा काळात आम्ही पूर्ण ताकतीने केळापूर तालुक्यात युवा मोर्चा चा काम वाढवू गाव तिथे शाखा बनवू असे आश्वासन ही दिलेे।
कार्यक्रमाचा प्रास्ताविक, संचालन युवा मोर्चा सचिव प्रमोद राउत यांनी केले, तर आभार उ.भा मोर्चा तालुका अध्यक्ष धीरज शर्मा यांनी केले।
यावेळी भारतीय जनता पार्टीचे संदीप बाजोरिया, ज्योतीशंकर कनोजे, भाजपा युवा मोर्चाचे दयानंद सोयाम, मनोज त्रिशूलवार, विशाल दुबे, शुभम जुमडे, कमोल गोपतवार, अतुल चीतलवार, शुभम घोडमारे, अनुप उसकेवार, संजू निकोडे, शुभम जुनघरे, गणेश सोनकडीवाल, प्रसाद पाठक, अक्षय गहरवाल, प्रसाद जैस्वाल, दिपक थोरात, आकाश उईके, प्रकाश भांदक्कर, अक्षय जयस्वाल, समीर गेडाम, रोहित खेडेकर, प्रवीण मंडले, अजय आत्राम आदिवासी आ. ता.अध्यक्ष, उभा मोर्चाचे मनोज दिक्षित, सोनू श्रीभाते तसेच भाजपा युवा मोर्चा चे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संखेत उपस्थित होते..।।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here