कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नये- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

0
610

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नये- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

 

ओबीसी आरक्षणाचा निकाल जोपर्यंत स्पष्टपणे लागत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नये.

मुख्य निवडणूक आयोग नवी दिल्ली व राज्य निवडणूक आयोग मुंबई यांना माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची मागणी.

 

प्रतिनिधी/अनंता वायसे तालुका प्रतिनिधी

वर्धा/हिंगणघाट :-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नये तसेच ओबीसी आरक्षणाचा निकाल जोपर्यंत स्पष्टपणे लागत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नये व मराठा समाजाला आरक्षण देऊन दिलासा देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्य निवडणूक आयोग नवी दिल्ली, राज्य निवडणूक आयोग मुंबई, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

कोरोना संक्रमणाच्या प्रादुर्भावाने मागील १५ महिन्यापासून देशातील जनता त्रस्त झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने कित्येक जण मृत्युमुखी पडले. दोन वेळा सरकारने लॉकडाउन करून, लसीचे नियोजन करून सुद्धा कोरोनाचा प्रभाव कमी झाला नाही आणि आता जनतेला तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संपूर्ण जण जीवन विस्कळीत झाले असून जनतेला भयानक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत नगरपालिका, नगरपंचायत ,जिल्हा परिषद, पंचायत समिती इत्यादी कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नये.

ओबीसी समाजाच्या आरक्षण जोपर्यंत पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नये तसेच मराठा समाजाला आरक्षण देऊन दिलासा द्यावा. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कोरोना प्रादुर्भावाचा तिसरा टप्पा सुरू असून लॉकडाऊन घोषित झाले आहे. अशाया भयानक परिस्थितीचा जनता सामना करीत आहे.कोरोनाच्या संक्रमणा सोबतच ब्लॅक फंगसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लस व्हेरीयंटचे संभावित संकट आले आहे.

तरी मुख्य निवडणूक आयोग ,राज्य निवडणूक आयोग व सरकार यांनी जनतेचा सर्वकष विचार करून निवडणुका घ्याव्यात अन्यथा भविष्यात सरकारला महामारीचा सामना करावा लागेल असे निवेदन माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here