महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूरात गँस सिलिंडर पेट्रोल व डिझेल भाववाढीच्या विराेधात तीव्र आंदोलन

0
493

महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूरात गँस सिलिंडर पेट्रोल व डिझेल भाववाढीच्या विराेधात तीव्र आंदोलन
🟣🟡🔷चंद्रपूर 🟣🟡किरण घाटे🔷🟣
गँस सिलिंडर, पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली असुन या भाववाढीने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे माेडले आहे .या भरमसाठ महागाईच्या विराेधात आज रविवार दि.२७डिसेंबरला दुपारी १वाजता स्थानिक गांधी चाैकातील महानगर पालिकेच्या प्रांगणात चंद्रपूर महिला राष्ट्रवादी कांग्रेस वतीने तीव्र आंदोलन करण्यांत आले🔷🟡🌀☀️ या वेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत भाजप सरकारचा निषेध देखिल नाेंदविला .🟣🟡🔷गँससिलिंडरच्या दरातील वाढ ही गेल्या दाेन वर्षातील सर्वाधिक असल्याचा स्पष्ट आराेप राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांनी या वेळी केला .तर ग्रामीण भागात राँकेलचा पुरवठा माेठ्या प्रमाणात करावा अशी मागणी मनपाचे भूतपूर्व नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेता दीपक जयस्वाल यांनी केली .🟡🔷🟣☀️🌀याच आंदोलनच्या वेळी डि.के . आरीकर यांनी केन्द्र सरकारवर जाेरदार टीका करत दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदाेलनाला चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पणे पांठिबा असल्याचे सांगितले .🟣🟡🔷🌀 आज झालेल्या आंदाेलनात प्रामुख्याने शहजादा अंसारी , सुरेखा ठाकरे , हर्षा खैरकर , अर्चना बुटले , शाेभा घरडे ,राणी राँय , स्वेता रामटेके , निलिमा नरवडे , नंदा शेरकी , सरस्वती गावनडे , सुमित्रा वैद्य व इत्तर पदाधिका-यांची व सदस्यांची माेठ्या प्रमाणात उपस्थिती हाेती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here