तारसा खुर्द येथे मान्यवरांचा हस्ते शिक्षक गौरव, कोविड योद्धा निरोप समारंभ सोहळा संपन्न

0
875

तारसा खुर्द येथे मान्यवरांचा हस्ते शिक्षक गौरव, कोविड योद्धा निरोप समारंभ सोहळा संपन्न

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या १६ शिक्षकांचा सन्मान

गोंडपिपरी : १५ सप्टेंबरला कारमेल अकाडमी तारसा खुर्द येथे शिक्षक गौरव, कोविड योद्धा व निरोप समारंभ सोहळा मोठ्या थाटामाटात सम्पन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी बिट भंगाराम तळोधीचे नामदेवराव राऊत हे होते. तर प्रमुख अतिथी धनराज आवारी गटशिक्षणाधिकारी पं. स. गोंडपीपरी, सुनील मुत्यालवार केंद्रप्रमुख विठ्ठलवाडा, शंभूजी येलेकर माजी प्राचार्य शिवाजी हायस्कुल विठ्ठलवाडा, राजकुमार दुर्योधन प्राचार्य शिवाजी हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय विठ्ठलवाडा, रागिणी श्रीवास्तव जेष्ठ शिक्षिका कारमेल अकाडमी तारसा खुर्द, टी.आर. महल्ले केंद्रप्रमुख चिमूर (माजी केंद्रप्रमुख विठ्ठलवाडा) हे होते.

सन २०१९-२० व सन २०२०-२१ या कालावधीत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या १६ शिक्षकांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल श्रीफळ व पुस्तक देऊन प स गोंडपीपरी शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक गौरव करण्यात आला.

या बरोबरच टी. आर. महल्ले केंद्रप्रमुख यांचा सपत्नीक निरोप समारंभ शिक्षण विभाग पंचायत समिती गोंडपीपरी, सर्व शिक्षक बंधू भगिनी केंद्र विठ्ठलवाडा, मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक तारसा खुर्द व कारमेल अकादमी तारसा खुर्द यांच्या वतीने करण्यात आला. कोविड 19 काळात ऑनलाईन व ऑफलाईन शैक्षणिक उपक्रम शालास्तरावर गौतम उराडे व उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षक विठ्ठल गोंडे सर विषय शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा यांनी राबविले त्यांच्या या कार्याची दखल जि. प. चंद्रपूर ने घेऊन त्यांना सन्मानपत्र व शिक्षण विभाग गोंडपीपरी च्या वतीने शाल, श्रीफळ, ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आदर्श शिक्षक गौतम उराडे तथा विषय शिक्षक विठ्ठलवाडा यांनी केले. तर कार्यक्रमाचे सदाबहार संचालन विठ्ठल गोंडे विषय शिक्षक विठ्ठलवाडा यांनी केले. तसेच परमानंद इंदोरकर यांनी शिक्षक गौरव सोहळा एक स्तुत्य उपक्रम व महल्ले सरांच्या कार्याचा यथोचित लेखाजोखा मांडला. कार्यक्रमाचे आभार जमनादास चांदेकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी रमेश भिले मुख्याध्यापक कोरम्बी यांनी व कारमेल अकादमी ची चमू यांनी कार्यक्रमाची सजावट करिता मोलाचे योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here