पहिल्यांदाच उदगीर सामान्य रुगणालयाची शून्य कोविड रुग्ण संख्या

0
486

पहिल्यांदाच उदगीर सामान्य रुगणालयाची शून्य कोविड रुग्ण संख्या

 

.बाबूराव बोरोळे

लातूर जिल्हा प्रतिनिधी

इम्फॅक्ट न्युज लातूर

8788979819

 

उदगीर कोरोना लढाईत आज एक समाधानाचा टप्पा उदगीर सामान्य रुग्णालय यांनी अनुभवला.

 

उदगीर शहरातील असंख्य नागरिक या कोविड काळात बाधित झाले व अनेकांनी या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आपले प्राण गमावले. मार्च 2020 पासून सुरू झालेली ही लढाई आजतागायत चालूच असून हा विषाणू आपले नवीन रूप घेऊन असंख्य अडचणी निर्माण करत आहे.सामान्य रुग्णालय उदगीर येथे आज एक समाधानाचा आशावादी अनुभव आला,आजच्या उदगीर सामान्य रुग्णालयाच्या तिसऱ्या लाटेच्या उपाय योजना निम्मित भेटीत लातूर जिल्हा चिकित्सक डॉ देशमुख लक्ष्मण यांच्या उपस्थितीत आज उदगीर विकास नगर  येथील गणेश खंदारे या 30 वर्षीय कोविड रुग्णाला सुट्टी दिली व उदगीर च्या सुरू असलेल्या कोविड युद्धाला कोरी पाटी पाहता आली. गत 17 महिन्यात पहिल्यांदाच रुग्ण संख्या शून्य झाली. या महिन्यात दि.१३ तारखे नंतर एक ही पॉझिटिव्ह रुग्ण आढळले नसून या मध्ये खारीचा वाटा येथील आरोग्य प्रशासनाने उचलला. या वेळी जिल्हा चिकित्सक डॉ देशमुख लक्ष्मण यांनी रुग्णाची चौकाशी करत येथे मिळलेल्या उपचाराची माहिती घेतली. या वेळी उदगीर सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दत्तात्रय पवार यांनी रुग्णालयाच्या वतीने सर्व नागरिकांना तिसऱ्या लाटे ला न घाबरण्याचे आवाहन करत जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. यावेळी उदगीर सामान्य रुग्णालायचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ शशिकांत देशपांडे यांनी तिसऱ्या लाटेच्या पूर्व तयारीचा आढावा सादर केला.उदगीर सामान्य रुग्णालयाचे डॉ डांगे,डॉ सानप, डॉ कुलकर्णी, डॉ.बिरादार,डॉ महिंद्रकर, डॉ भोसले, डॉ अरदाले,डॉ रामशेट्टे व इतर टीम यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here