आरोग्य उपकेंद्र लाठी येथे 100 लोकांना कोविड चे लसीकरण

0
528

आरोग्य उपकेंद्र लाठी येथे 100 लोकांना कोविड चे लसीकरण

पुरुषासह महिलांनी घेतली कोविडची लस

वणी/प्रतिनिधी : तालुक्यातील लाठी येथील आरोग्य उपकेंद्रात पुरुष व महिलांचे असे एकूण 100 लोकांचे यशस्वी लसीकरण झाले. लसीकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करण्याची जवाबदारी गावातील ग्रामपंचायतीची असेल असे शासकिय आदेश निर्गमित करण्यात आले होते त्याच आदेशानुसार लाठी येथे लसीकरण ठेवण्यात आले होते. यावेळी गावातील 30 वयोगटावरील लोकांना लसीकरण करण्यास प्रोत्साहीत केले.
लाठी गावातील उपकेंद्रात सुरू झालेल्या लसीकरणामुळे गावातील प्रत्येक नागरिकांना कोविड ची लस घेण्यास सोयीस्कर झाले.
गावात प्रत्येकानं कोविड ची लस घेण्याचे आव्हान तलाठी वासनिक मॅडम, पोलीस पाटील संजीवनी खिरटकर, ग्रामसेविक कातकडे, ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर, ग्रामपंचायत सदस्य रीना लाडे, उपसरपंच अभिजीत यादव, मुख्याध्यापक गेडाम, गुलाब आवारी, अंगणवाडी सेविका मीरा माहुरे, ज्योती मांडवकर यांनी केले.
यावेळी लसीकरणाला आरोग्य विभागाच्या कर्मचारी कुसुम बाराहाते,मदतनीस चंद्रकला कन्नके,mpw प्रवीण आस्वले,ऑपरेटर किशोर लखमापुरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here