पदाधिकारी यांचा कार्यकाळ संपला कारभार मात्र काम सुरुच

0
539

पदाधिकारी यांचा कार्यकाळ संपला कारभार मात्र काम सुरुच

नाली बांधकामाचे लोकेशनच बदलविले  नांदा ग्रामपंचायतीत अजब कारभार

 

गडचांदूर :- कोरपना तालुक्यातील नांदा ग्रामपंचायतीचा पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ २५ जुलै २०२१ मध्ये संपल्याने शासनाने प्रशासकाची नेमणुक केली आहे. शासनाकडून प्राप्त १५ वा वित्त आयोग निधी व पेसा निधीतून अनेक ठिकाणी रस्ते व नाली बांधकाम सुरू आहेत. परंतू येथील पदाधिकारी कार्यकाळ संपला तरी ग्रामपंचायतीचे काम आम्हीच करीत आहे असे भासवून ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला तरी पदाधिकारी यांचा कारभार मात्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामपंचायतीच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या अट्टाहासातून जवळील कंत्राटदाराला हाताशी धरुन नाली बांधकामाचे लोकेशन बदलवून बांधकाम सुरु आहे. प्रशासक व सचिवांनी वेळीच लक्ष देण्याची गरज असुन माजी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचा कारभार बंद करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे

कंत्राटदाराचा गजब कारभार
स्थानिक कंत्राटदारांकडून नालीचे काम सुरू आहे कामाचे ठिकाणी जुनी नाली दिसते. परंतू ती नाली पूर्णपणे नाली उपसली नसून त्यातच थातुर मातुर पि सि सी टाकून त्यावर पाईप टाकले असून विटाचे चेंबर बनविण्यात आले असून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले.

अभियंता यांना लोकेशनच माहिती नाही
जि.प. बांधकामाचे विभागाचे अभियंता झोडे यांची कामावर देखरेख आहे. त्यांनीच अंदाज पत्रक तयार करून दिले परंतू त्यांना सदर लोकेशन सुद्धा त्यांना माहीत नाही. तर मग ठेकेदाराला नाली बांधकाम चे लेआऊट कोणी दिले आणि काम सुरू करण्यास अनुमती कोणी दिली यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

निकृष्ट दर्जाचे काम व्यवस्थित करण्याचा आदेश
स्थानिक कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येत असल्याची तक्रार असल्याने जि.प. बांधकाम उप अभियंता माथनकर यांनी कामाची पाहणी केली अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम असल्याने अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

“गजानन टिकले ते शिरसाटी यांचे घरापर्यंत नालीबांधकाम करावयाचे होती. परंतु काम दुसर्‍याच ठिकाणी सुरु आहे यापुर्वीही लोडर दवाखाना जवळील सिमेंट रस्त्याचा दर्जा बरोबर नसल्याने सहा महीन्यातच गिट्टी दिसत आहे प्रकरण उघडकीस आल्याने पदाधिकारी माझे घराकडे आले होते सिमेंट काँक्रीटची नाली बनवून देऊ असे आश्वासन देऊन गेले.” 
कपिल सुरेश बुरांडे, माजी ग्रामपंचायत सदस्य
नांदाफाटा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here