नेरी ग्राम पंचायतचा मनमानी कारभार! ग्रा. प. सदस्य पिंटू खाटीक, संगीता कामडी व अन्य सदस्यांचा आरोप 

0
450

नेरी ग्राम पंचायतचा मनमानी कारभार!
ग्रा. प. सदस्य पिंटू खाटीक, संगीता कामडी व अन्य सदस्यांचा आरोप 
नेरी (चिमूर ) किरण घाटे 🟢🟣नेरी ग्रामपंचायतचा मनमानी कारभार सुरू असून सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी हे इतर सदस्य यांना विचारीत नसून त्यांना विश्वासात न घेता अंगणवाडी बांधकामाच्या कामाला सुरुवात केली आहे सदरहु अंगणवाडी बांधकाम बाबत चे नियोजन सुद्धा नियमाप्रमाणे न करता आपल्याच मर्जीने सुरू केले आहे असा आरोप ग्रा प .सदस्य पिंटू खाटीक संगिता कामडी आणि इतर आठ सदस्यांनी केला आहे
या बाबत असे कळते की अंगणवाडी चे बांधकाम हे मार्च महिन्यानंतर करावयाचे होते तसे नियोजन देखिल झाले होते सदरहु कामाचे 13 मार्चला भूमिपूजन झाले .मात्र शासनाच्या नियम बाह्य पद्धतीने अंगणवाडी च्या कामाला सुरुवात झाली होती तेव्हा पिंटू खाटीक आणि इतर सदस्यांनी काम थांबवण्यासाठी गटविकास अधिकारी यांना तक्रार देऊन चौकशीची मागणी केली होती . 13मार्चला गट विकास अधिकारी यांनी काम तात्काळ थांबवण्यात यावे असे पत्र सचिव व सरपंच याना दिले .अन्यथा होणाऱ्या कारवाईस आपण स्वत जबाबदार राहाल असा इशारा सुध्दा दिला होता त्यामुळे या अंगणवाडीचे काम थांबवण्यात आले होते या कामाची चौकशी करण्यासाठी 16 मार्चला या क्षेत्राचे विस्तार अधिकारी गुंतीवर आले आणि चौकशी करून सर्व सदस्यांना बोलावून सांगितले की अंगणवाडीचे कामाला वेळ असून सदरहु काम हे मार्च नंतर सुरू करण्यात यावे असे पत्र देऊन गेले परंतु त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली असून उपराेक्त कामाला आज दि .27 मार्चला सुरवात झाली अाहे .एकंदरीत ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांचा मनमानी कारभार सुरु असल्याचे दिसून येते असा आरोप ग्रा .प .सदस्य पिंटू खाटीक, संगीता कामडी आणि इतर 8सदस्यांनी केला आहे.
सदरहु काम हे शासन निमप्रमाणे नसून शासनाच्या अटी व शर्तीचे अधीन नसून नियम बाह्य आहे तरी संबंधित विभागाने या बाबीची सखोल चौकशी करून काम तात्काळ थांबवावे तसेच या कामासाठी खोदलेले खड्डे बुजवण्यात यावे जेणे करून लहान मुले आणि जनावरे यांची जीवित हानी होणार नाही आणि प्राणहानी होणार नाही. सुरु असलेल्या कामाची पूर्ण चौकशी करून नंतरच कामाला सुरुवात करावी अशी मागणी पिंटू खाटीक , संगीता कामडी आणि इतर सदस्यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here