चंद्रपूरात काम करायच असेल तर स्थानिकांना रोजगार द्यावाच लागेल – आ. किशोर जोरगेवार

0
507

चंद्रपूरात काम करायच असेल तर स्थानिकांना रोजगार द्यावाच लागेल – आ. किशोर जोरगेवार

स्थानिकांना रोजगार द्या या मागणीसाठी यंग चांदा ब्रिगेडचा भव्य मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

कोळसा, पाणी, जागा आमची आणि रोजगार बाहेरच्यांना असाच काहीसा प्रकार वेकोलीत अंतर्गत चालणा-या खाजगी कंपण्यांमध्ये सुरु आहे. मात्र आता हे चालू देणार नाही. चंद्रपूरात काम करायचे असेल तर येथील भुमीपुत्रांना रोजगार द्यावाच लागेल अन्यथा तुमचे काम बंद पाडू असा ईशाराच आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोली प्रशासनाला दिला आहे.
वेकोली अंतर्गत चालणा-या विविध खाजगी कंपण्यांमध्ये स्थानिकांना रोजगार द्या या मागणीसाठी आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधीत करतांना ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, शहर महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकर, विश्वजीत शाहा, अमोल शेंडे, साहिली येरणे, दुर्गा वैरागडे, तापूष डे, नितीन शाहा, रुपेश कुंदोजवार, विनोद अनंतवार, विलास वनकर, हरमन जोसेफ, नितीन शाहा, तिरुपती कालेगुरवार, आनंद रणशूर, राजेश वर्मा, आदि गिर्वेनी , दिनेश इंगळे, आदिंची उपस्थिती होती.
चंद्रपूर हे औद्योगीक शहर म्हणून ओळखल्या जाते. येथे सर्वत्र वेकोलीची जाळे पसरले आहे.


याचा मोठा दुष्यपरिणामही प्रदुषणाच्या माध्यमातून चंद्रपूरकरांना सोसावा लागत आहे. असे असले तरी या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार दिल्या जात नाही. परिणामी उद्योग असूनही येथे बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. त्यामूळे वेकोली अंतर्गत चालणा-या विविध खाजगी कंपण्यांमध्ये स्थानिकांना रोजगार द्या या प्रमूख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. दुपारी १२ वाजता या मोर्चाला गांधी चौकाजवळून सुरुवात झाली. त्यानंतर शहराच्या मुख्य मार्गाने होत हा भव्य मोर्चा वेकोली प्रशासनाविरोधात नारेबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात चंद्रपूर शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येत नागरिक सहभागी झाले होते.


या मोर्चाला संबोधीत करतांना आ. जोरगेवार पूढे म्हणाले कि, चंद्रपूरात कोळसा, जागा, पाणी, विद्यूत या सर्व गोष्टी पूरक प्रमाणात उपलब्ध असल्यामूळे येथे उद्योग आलेत. यातून येथील बेरोजगारी दूर होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. येथील नौक-यांमध्ये नेहमीच भुमीपूत्रांना डावलण्यात आले. परिणामी उद्योग असूनही येथील युवक हा बेरोजगार राहिला आहे. वेकोली अंतर्गत विविध खाजगी कंपण्या काम करत आहे. या कंपण्यांमूळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. परंतु येथे काम करण्यासाठी बाहेरुन कामगार आणल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामूळे आमच्या हक्काच्या नौक-यांपासून आमालाच वंचित राहावे लागत आहे. मात्र यापूढे हे खपविल्या जाणार नाही. मायनिंग सरदार व फायरमॅनच्या रिक्त जागा कोलकत्ता येथे भरुन तेथील युवकांना चंद्रपूरात पाठविण्याचे कट रचल्या गेले होते. मात्र या विरोधात नागपूर येथील वेकोलीच्या सिएमडी कार्यालयावर मोर्चा काढत येथील युवकांनाच रोजगार द्या अशी मागणी केली होती. त्यानंतर ४०० हून अधिक जागा वेकोली प्रशासनाच्या वतीने काढण्यात आल्या. त्यामूळे आता पून्हा एकदा आजवर चालत आलेल्या बाहेरील कामगारांना पूरक अशा रोजागाराच्या निकशाविरोधात लढा उभारावा लागणार असून यात चंद्रपूकरांचेही योगदान लागणार असल्याचे आ. जोरगेवार म्हणाले. आजचा यंग चांदा ब्रिगेडचा हा भव्य मोर्चा वेकोली प्रशासनाच्या भुमीपुत्रांच्या विरोधातील धोरणा विरोधात व स्थानिकांच्या सन्मानासाठी काढण्यात आला असून यंग चांदा ब्रिगेड नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच पूढाकार घेणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले, यापूढे बैमानी, अन्याय खपवून घेणार नाही. येथील भुमीपूत्रांना रोजागार देणार नसाल तर येथे कामही करु देणार नाही. याचा परिणाम कोळसा उत्पादनावर झाला तर त्याची जबाबदारी वेकोली प्रशासनाचीच असेल असेही ते यावेळी म्हणाले,
मोर्चात बेरोजगारीमूळे युवकांवर ओढावलेल्या संकटावर आधारीत प्रात्यक्षीकीचे सादरीकरण करण्यात आले होते. मोर्चात हजारोच्या संख्येने भुमीपूत्र सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेत त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here