ब्रेकिंग न्यूज! गोवरी १ आरसी ऑफिस येथे घडला मोठा अपघात

0
898

ब्रेकिंग न्यूज! गोवरी १ आरसी ऑफिस येथे घडला मोठा अपघात

डंपर घुसली ऑफीसात, चार जण गंभीर जखमी

राजुरा, अमोल राऊत (१६ एप्रिल) : वेकोली मध्ये दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. वेकोली गोवरी १ आरसी ऑफिस मध्ये आज सकाळी ८:४० वाजता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डंपर (डंपर क्रमांक 60502) घुसली. यात चार जण जखमी झाले असून दोघे गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
यात प्रभाकर चन्ने, प्रसाद साहेब, मायनिग सरदार जे. पी. महाथो, अंडर मॅनेजर साखरे साहेब यांचा समावेश असून महाथो व साखरे यांना गंभीर दुखापत झाली असून यांना डब्ल्यूसीएल एरिया हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
डंपर मेंटनन्सकरिता नेत असतांना चालकाच्या अनवधानाने ब्रेक ऐवजी एक्सलेटर दबल्याने हा मोठा अपघात घडला. चालक शामराव मुसळे अंदाजे ५० वर्ष असून तो डंपर सेक्शन फिटर पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे. डंपरने दिलेल्या धडकेत ऑफिसचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here