वंचित बहुजन आघाडी चंद्रपुर तर्फे रक्तदान शिबिर सप्ताहाचे उदघाटन

0
610

वंचित बहुजन आघाडी चंद्रपुर तर्फे रक्तदान शिबिर सप्ताहाचे उदघाटन

१३० यूनिट रक्तदान करण्याचा संकल्प

कोरोना काळात पहिल्या दिवशी १२ रक्तदात्यानी केले रक्तदान

चंद्रपूर/प्रतिनिधी : आज कोरोना चा महाभयंकर काळ सुरु असताना रक्ताचा तुटवडा सम्पूर्ण देशात पडला आहे. त्याच प्राश्वभुमीवर छत्रपति शिवाजी महाराज जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त आज दिनांक 15/04/2021 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रक्तदान शिबीर सप्ताहाचे उदघाटन करण्यात आले.

महापुरुषांच्या प्रतिमाणा पुष्पहार व अभिवादन करुन या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष थोरात सर यांनी करून रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनतर रक्तदानाला सुरुवात झाली, पहिल्या दिवशी 12 रक्तदात्यानी रक्तदान केले. वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात आज 12 रक्तदात्यानी रक्तदान केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर उपाध्यक्ष सुभाष थोरात, जिल्हा सदस्य मिलिंद दुर्गे, कृष्णाक पेरकावर, सोनल वाडके, अशोक पेरकावार, अक्षय लोहकरे, विशेष निमगडे, विष्णू चापले, कुणाल उराडे, बादल पिंपळे, हर्षवर्धन कोठारकर, विवेक दुपारे, प्रणित तोडे, राहुल शेंडे, आकाश गेडेकर आदिनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here