सुधिरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र राजुराच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

0
220

सुधिरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र राजुराच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

देशसेवा आणि समाजसेवेच्या जाणिवेतून दर्पणसारख्या नियतकालिकाचा जन्म

माजी जिल्हा परीषद अध्यक्ष देवराव भोंगळे : पत्रकारांनी मानले आभार

राजुरा : सुधिरभाऊ सेवा केंद्र व देवराव भोंगळे राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने येथिल कार्यालयात पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवराव भोंगळे यांनी सांगितले की, जगभरात घडलेली प्रत्येक घटना आपल्याला टिव्ही, वृत्तपत्रातून जनतेपर्यंत पोहचविणारे पत्रकार रात्रंदिवस मेहनत करुन ती माहिती जनतेपर्यंत पोहचवित असतात. ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील एक उच्चविद्याविभूषित, पंडित व्यक्तीमत्व असलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पन या वृत्तपत्राव्दारे मराठी भाषेतील पत्रकारीतेची मुहूर्तमेढ रोवली. देशसेवा आणि समाजसेवेच्या जाणिवेतून दर्पणसारख्या नियतकालिकाचा जन्म झाला, मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकर यांचा मोठा वाटा आहे. म्हणून त्यांच्या जन्मदिनी ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केल्या जात असल्याचे मत व्यक्त केले.

राजुरा येथे सुरु असलेल्या सुधिरभाऊ सेवा केंद्र व देवराव भोंगळे राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने येथिल कार्यालयात सकाळी ११ वाजता राजुऱ्यातील पत्रकारांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी देवराव भोंगळे माजी अध्यक्ष जिल्हा परीषद चंद्रपूर हे होते तर प्रमुख पाहुणे विनायक देशमुख, विनोद नरेंदुरवार उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी सांगितले की, सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवा म्हणून निर्भिड व संयमपणे उन, वारा पाऊस, थंडीतही वेळेचे बंधन न पाळता रात्रंदिवस आपणापर्यंत बातम्यांचा अखंड स्त्रोत पोहचविण्याचे कार्य करणाऱ्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी पत्रकार बांधवांनी बदलत असलेली पत्रकारीता आणि पत्रकारांसमोर असलेली आव्हाने याविषयी आपले मत व्यक्त करीत शहरात पहिल्यांदा एवढ्यामोठ्या प्रमाणात पत्रकारांचा सत्कार सोहळा घेतल्याबद्दल भोंगळे यांचे आभार मानले. या सत्कार सोहळ्यात तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बी. यु. बोर्डेवार, राजुरा पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण गोरे, सुरेश साळवे, डॉ. उमाकांत धोटे, मसूद अहमद, बाबा बेग, एजाज अहमद, अनिल बाळसराफ, गणेश बेले, बादल बेले, सागर भटपल्लीवार, संतोष कुंदोजवार, सय्यद जाकीर, मंगेश श्रीराम, बंडू वनकर, मनोज आत्राम, आनंद चलाख, प्रफुल शेंडे, फारुख शेख, प्रविण देशकर, मिलींद देशकर, उमेश मारशेट्टीवार, मुखरु सेलोटे, मंगेश बोरकुटे, शाहनावज कुरेशी, साहिल सोळंके, दिपक शर्मा, रंगराव कुळसंगे, रत्नाकर पायपरे, विजय जुल्मे यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here