भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश त्रिवार्षिक २० वे दोन दिवसिय अधिवेशनाचे आयोजन

0
232

भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश त्रिवार्षिक २० वे दोन दिवसिय अधिवेशनाचे आयोजन

भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश त्रिवार्षिक २० वे दोन दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी स्वागत सेलिब्रेशन हाॅल, भद्रावती येथे सदर अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला सर्व भारतीय मजदूर संघाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून या अधिवेशनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक भारतीय मजदूर संघ चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रमोद येलचलवार तसेच जिल्हा मंत्री प्रविण मुनगंटीवार यांनी केले आहे.

भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेशचे “२० वे त्रैवार्षिक अधिवेशन” २७,२८ जानेवारी २०२४ रोजी भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे होणार आहे. या दोन दिवसीय अधिवेशनात कामगारांच्या हिताच्या अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा करून ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
उपरोल्‍लेखित अधिवेशन होण्‍यासाठी तन, मन, धनाने सहकार्य करा आणि संमेलनात आयोजित प्रतिनिधी मार्फत उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिवेशन कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री.बी.सुरेंद्रनजी, विशेष अतिथी जिल्हाचे पालकमंत्री ना.मा.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, कामगार मंत्री मा.ना. डाॅ. सुरेशभाऊ खाडे, अ.भा.महामंत्री मा.ना.श्री. रविंद्रजी हिंमते, प्रमुख अतिथी अ.भा. उपाध्यक्ष मा.सौ. निताताई चोबे, पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री मा.ना.श्री. सि.व्ही. राजेशजी यांच्या उपस्थित तसेच प्रदेश अध्यक्षा सौ.शिल्पाताई देशपांडे, प्रदेश महामंत्री गजाननजी गटलेवार, प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रभारी चंद्रपूर जिल्हा विवेकजी अल्लेवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here