अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड माणिकगड तर्फे नोकारी येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर…

0
22

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड माणिकगड तर्फे नोकारी येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर…

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारे आजूबाजूच्या गावाचा आरोग्याकडे लक्ष देत नेत्र तपासणीवर विशेष जोर देताना दिसत आहेत. यामध्ये बैलमपूर, मानोली व जामणी यानंतर नोकारी येथील ग्रामपंचायत मध्ये मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन केले.
या शिबिरात एकूण 96 वृद्ध महिला व पुरुष यांची तपासणी करून त्यांना औषपचार करण्यात आला तर एकूण 79 लोकांच्या डोळ्याचा नंबर काढून चष्मा बनविण्याकरिता पाठविण्यात आला.
पुढील 1 हफ्तायामध्ये नोकारी येथील सर्व 79 लोकांना चष्मा बनवून वाटप करण्यात येणार आहे.
तसेच मागील महिन्यात बैलमपूर, मानोली व जामणी येथील 312 लोकांची तपासणी करून 218 नागरिकांना चष्मा वाटप करण्यात आला आहे.
चष्मा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर्ती आनंद दिसत होता, त्याकरिता त्यांनी माणिकगढचे मनापासून आभार व्यक्त केले.

या शिबिरात नेत्र चिकित्सक, चंद्रपूर ड्रॉ. पराग टेंभूर्डे व त्याच्या पथकाची उपस्थिती होती. तसेच गांवातील सरपंच मनीषा पेंदोर व उपसरपंच वामन तुराणकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आणि त्यांनी माणिकगढचे या उपक्रमाबद्दल विशेष आभार मानले.
या शिबिराला यशस्वी करण्यास सी.एस.आर. टीम माणिकगड ने अथक प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here