एसीसी सिमेंट कंपनीत घाण कचरा नेणारा ट्रक अडकल्याने वाहतूक खोळंबली…

0
30

एसीसी सिमेंट कंपनीत घाण कचरा नेणारा ट्रक अडकल्याने वाहतूक खोळंबली…

घुग्घुस, ७ मे :- येथील एसीसी सिमेंट कंपनीत जाणारा ओव्हरलोड घाण कचरा भरलेला ट्रक क्रमांक एमएच १७ बीवाय ०००६ पोलीस स्टेशन जवळ रेल्वे पटरीच्या वरील अँगलला लागल्याने सांयकाळी ५:३० वाजेच्या सुमारास अर्धातास वाहतूक खोळंबली होती. या ट्रक मध्ये घाण कचरा असल्यामुळे दुर्गंधी सुटली होती. यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागला.

याठिकाणी ट्राफिक पोलीस देखील उपस्थित नव्हता. यामुळे बराच वेळ दुर्गंधी सहन करत नागरिकांना ताटकळत राहावे लागले. तरी नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवुन एसीसी कंपनीत मध्ये जाणारा घाण कचरा बंद करावा अशी मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here