कवि संमेलनात कोरोना योद्धांचा सन्मान ! 

0
579

 

पुणे -किरण घाटे -विशेष प्रतिनिधी

 

महाराष्ट्राच्या डाॅ .बाबासाहेब आंबेडकर साहित्य मंच पुणे विभागाच्या वतीने नुकतेच कोरोना योद्धांवर आधारित एक कविसंमेलन पार पडले .साेबतच विशेष उल्लेखनिय कामगिरी करणां-या कोरोना योद्धांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी महानगर पालिकेचे मुख्य प्रशासक सुरेश कुराडे व नगरसेविका रूपालीताई धावडे उपस्थित होत्या.या शिवाय .मनोज जाधव (मुख्य प्रशासक व संस्थापक)सुनिल सुरेखा ,जितेंद्र मोहिते आणि जनार्दन मोहिते यांची उपस्थिती होती सर्वांनी कोरोना योद्धांना या प्रसंगी शुभेच्छा दिल्या . जिल्हाध्यक्षा वैशाली लांडगे यांनी कार्यक्रमाचे अप्रतिम सुत्रसंचालन केले.कोरोना योद्धा यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना अनुभव कथन केले यात डाॅ. अंजली सावंत पनवेल,कु.मीना कोंढालकर सेविका पुणे,विद्या रोकडे शिक्षिका पुणे .रचना पोटे पुणे,.आनंद लोंढे पुणे.सुनिता घरडे प्रथम संस्था पुणे यांचा सहभाग होता.

कवी व कवयित्री यांनी कोरोना योद्धांवर कविता गायिल्या..यात कवि व कवयित्री रेखा फाले, अमोल साबळे, रेखा पाटील, भिमराज तांबे,शुभम चांदणे जनार्दन मोहिता,भावना खोब्रागडे, नीरज आत्राम,मनोज जाधव,,ज्ञानेश्वर सुखदेव, अशोक पवार, जान्हवी मोहिते यांचा समावेश हाेता. गायिका सुरेखा वाघमारे यांचा कोरोना योद्धांना सलाम या गीताचा व्हिडिओ या वेळी शेअर करण्यात आला.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य मंच महाराष्ट्र पुणे विभागच्या जिल्हा संपर्क प्रमुख कांचन मुन यांनी देखिल या कार्यक्रमात आपला सहभाग नाेंदविला हाेता. विशेष म्हणजे आज पावेताे उपरोक्त साहित्य मंचा तर्फे ५०० पेक्षा अधिक काेराेना याेध्दांचा सत्कार व सन्मान करण्यांत आला असल्याचे कांचन मुन यांनी आमचे प्रतिनिधीशी भ्रमणध्वनी वरुन बाेलतांना आज सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here