ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रतर्फे रुग्णांची १९ वी तुकडी शस्त्रक्रियेसाठी रवाना

185

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रतर्फे रुग्णांची १९ वी तुकडी शस्त्रक्रियेसाठी रवाना

रुग्ण सेवेचे कार्य निरंतर सुरु- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

घुग्घुस शहरातील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रतर्फे रुग्णांची १९ वी तुकडी विविध आजारांवर शस्त्रक्रियेसाठी रविवार, १२ मार्च रोजी सकाळी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातून आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी (मेघे) ला रवाना करण्यात आली आहे.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून घुग्घुस व परिसरातील रुग्णांना विविध शस्त्रक्रियेसाठी आज येथून आचार्य विनोबा भावे रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. विविध प्रकारचे आजार ज्या रुग्णांना झाले आहे त्या सर्वांची शस्त्रक्रिया मोफत ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र ही करत आहे. मागील अनेक वर्षांपासून रुग्ण सेवेचा उपक्रम निरंतर सुरु आहे.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जि.प. सदस्य चिन्नाजी नलभोगा, भाजपाचे साजन गोहने, रत्नेश सिंग, प्रवीण सोदारी, सिनू कोत्तूर, हनीफ शेख, अजय लेंडे, बंटी आगदारी, आकाश येलपुलवार व सुनंदा लिहीतकर उपस्थित होते.

advt