महिलांनी स्वतःचे संरक्षण स्वतः केले पाहिजे – प्रोफेसर प्रोमिला बत्रा
प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

गडचांदूर :- भारतीय समाजात परंपरेने स्त्रियांचा दर्जा हा कनिष्ठ मानला जातो. मुलगी ही परक्याचे धन आहे असे मानल्याने तिचा लवकर विवाह केला जातो. तिला संसारीक बंधनामध्ये अडकून तिची त्यातून सुटका होत नाहीआणि स्त्रियाही हे मान्य करतात. समाजात अनेक कारणाने स्त्रियांची हत्या केली जाते. त्यामुळे तिचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी होत आहे.असे जर स्त्रियांचे प्रमाण कमी झाले तर एक काळ स्त्रियांना मिळवण्यासाठी पुरुषात संघर्ष निर्माण होऊ शकतो. आणि समाजात अनेक समस्या निर्माण होणार. समाजाला भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यातून वाचवायचे असेल तर स्त्रियांचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी स्त्रियांना वेग-वेगळे प्रशिक्षण, शिक्षण देऊन आत्मनिर्भर बनविले पाहिजे यासाठी महिलांनीही स्वतःचे संरक्षण स्वतः केले पाहिजे असे प्रतिपादन रोहतक (हरीयाना) येथिल M.D.U. च्या प्रोफेसर प्रोमिला बत्रा मॅडम यांनी केले.
शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूरच्या समाजशास्त्र व आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे “स्त्रीभ्रूणहत्या आणि सामाजिक जबाबदारी” या विषयावर ऑनलाईन एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांनी केले. त्यांनी स्त्री-पुरुष यांच्या कोणताही भेदभाव करता कामा नये असे प्रतिपादन केले. या प्रसंगी सूत्रसंचालन डॉ.संजय गोरे यांनी केले या राष्ट्रीय वेबिनार मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी व इतर मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. माया मसराम यांनी केले. व भूमिका विशद केली. या वेबिनारच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.