चिमूर मध्ये कोरोना वाढता प्रादुर्भाव

0
476

चिमूर मध्ये कोरोना वाढता प्रादुर्भाव

प्रशासनाने निष्काळजीपणा करू नये – आमदार बंटीभाऊ भांगडीया

कोरोना संदर्भात प्रशासकीय बैठक

चिमूर/प्रतिनिधी । चिमूर शहर व तालुक्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे तेव्हा प्रशासन मात्र नरमाई धोरण अवलंबित असल्याने कोरोना वाढत आहे विना मास्क असणाऱ्या वर प्रतिबंध घालण्याचे आवश्यक असून कोरोना लस डोज वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी गाव पातळीवर एक समिती तयार करून कोरोना लस डोज वाढवायचे आहे कोरोना वाढू नये यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलणे आवश्यक असल्याचे निर्देश आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिले.

चिमूर तहसील कार्यालयात कोरोना प्रादुर्भाव बैठकीत आमदार बंटीभाऊ भांगडीया बोलत होते यावेळी जीप उपाध्यक्ष सौ रेखाताई कारेकर ,भाजपचे तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, एसडीओ संकपाळ, चिमूर पोलीस स्टेशन ठाणेदार शिंदे,भिसी ठाणेदार गभणे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार बंटीभाऊ भांगडीया म्हणाले की कोरोना लस चा टार्गेट वाढवून चिमूर शहरात दररोज दोनशे कोरोना डोज देणे गरजेचे असल्याचे सांगत भिसी ,शंकरपुर नेरी मासळ, खडसंगी गावात सुद्धा निष्काळजी न करता कडक कारवाई करण्याचे सांगितले काही अडचणी आल्यास त्या अडचणी सोडविण्यासाठी आपण तत्पर असल्याचे सांगितले.

यावेळी वैधकिय अधिकारी डॉ भगत, डॉ अश्विन अगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मेश्राम ,नप चे चौगुले, बीडीओ पुरी उपस्थित होते.

तसेच या बैठकीस डॉ श्यामजी हटवादे, राजु देवतळे, विनोद चोखरे प्रशांत चिडे अशोक कामडी नाना मेश्राम अजय शीरभैय्ये, रमेश कंचर्लावार, संजय कुंभारे, अरुण लोहकरे विकी कोरेकर सुरज नरुले योगेश सहारे , शैलेश पाटील अरुण सालेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here