आईवडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांना दिली आर्थिक मदत
१५ हजार रुपयांचा दिला धनादेश ; चंद्रपूरचे प्रवीण कुलटे यांचा पुढाकार

विकास खोब्रागडे । चिमूर तालुक्यातील बेलारा या गावातील प्रमोद रामचंद्र जीवतोडे या विवाहित युवकाचा सोलर मशीन च्या तारात पाय गुंडाळल्याने मृत्यू झाला .१५ महिन्यांपूर्वी प्रमोद च्या पत्नी चा मृत्यू झाला होता त्यामुळे ती दोन लहान मुले अनाथ झाली या दुःखद आशयाची वर्तमान पत्रात वाचन केल्यावर चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीणजी कुलटे यांचे मन गहिवरून आल्याने त्यांनी त्या आईवडीलाचे छत्र हरपलेल्या दोन लहान मुलांना आर्थिक मदत देण्याचा निश्चय करीत त्यांनी शोध घेत चंद्रपूर वरून बेलारा येथे चिमूर येथील पत्रकार मंडळी ना सोबत घेऊन बेलारा गाठले.
बेलारा येथील त्या दोन लहान मुलांचे आजोबा रामचंद्र जीवतोडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती घेतली प्रवीणजी कुलटे यांचे मन गहिवरले वाढदिवस ,फटाक्यांची आतिषबाजी न करता शेतकरी ,शेतमजूराच्या मुलांना मदत करणे हेच ईश्वरसेवा समजून त्यांनी ११ हजार रुपये देण्याची मदत देत असताना त्यांच्या सोबत आलेल्या एका मित्राने ४ हजार रुपये मदत देत
त्या लहान मुलांचे आजोबा रामचंद्र जीवतोडे यांना १५ हजार रुपये चा धनादेश दिला.