संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त वरूर रोड येथील युवकांचे स्वच्छ्ता अभियान 

0
550

संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त वरूर रोड येथील युवकांचे स्वच्छ्ता अभियान 

🟢🌀राजुरा🛑🌀किरण घाटे🟡🟥

थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोडला स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. 🟥🟩🟡गेल्या दोन वर्षांपासून वरूर् रोड येथील वाचनालयातील युवक महामानवाच्या जयंती पुण्यतिथी निमित्त विविध उपक्रम व लहान विद्यार्थ्यासाठी स्पर्धेचे आयोजन करीत असते.या वर्षी देखिल संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त युवकांनी आप आपल्या हातात झाडू घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील संपूर्ण परिसर स्वच्छ केला.तदवतच गोळा केलेला सर्व केरकचरा ग्रामपंचायत कार्यालय वरूर् रोड यांच्याकडे सुपूर्द केला. ☀️🛑🟡🟩संत गाडगे बाबा म्हणतात की, देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणूनच मानवतेची आयुष्यभर सेवा करा. त्यांनी आपल्या किर्तनातून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, गरिबी,कुपोषण, शोषण , लुबाडणूक या विरुद्धच्या बुरसटलेल्या व्यवस्थेवर अक्षरशः अासूड ओढलेत. 🛑🟩🟡🌀राबविण्यात आलेल्या उपक्रमात प्रवीण चौधरी, प्रज्वल बोरकर, गौरव हिवरे, साहिल मडावी, करण उरकुडे, राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशाल शेंडे या युवकांनी भाग घेतला .व सदरहु आयाेजित उपक्रमातुन गावकऱ्यांना स्वच्छतेचा मंत्र पटवून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here