1857 क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती काँग्रेस कार्यालयात उत्साहात साजरी

110

1857 क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती काँग्रेस कार्यालयात उत्साहात साजरी

घुग्घूस : चंद्रपूर जिल्हा हा स्वातंत्र्य संग्रामात सदैव अग्रेसर होता इंग्रजा विरोधात देशाच्या स्वातंत्र्याखातर अनेक शुरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्या आहेत.

यांपैकी इंग्रजी सत्तेला पळो की सळो करून सोडणारे चांदागडचे शूरवीर क्रांतिकारक बाबूराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त आज काँग्रेस कार्यलयात 190 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व दिपक पेंदोर,गणेश किन्नाके,अंकुश उईके यांच्या हस्ते बाबूराव शेडमाके यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,अलीम शेख, रोशन दंतलवार, विजय माटला,बालकिशन कुळसंगे,देव भंडारी, सुनील पाटील,रफिक शेख,कुमार रुद्रारप,कपिल गोगला, अंकुश सपाटे,उपस्थित होते.

advt