डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनभर न्यायाच्या हक्कासाठी झटले : सिध्दार्थ पथाडे

0
455

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनभर न्यायाच्या हक्कासाठी झटले : सिध्दार्थ पथाडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले, विविध पक्षातील नामवंतांचा सत्कार 

 

कोरपना प्रतिनिधी
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनभर न्यायाच्या , हक्कासाठी झगडून न्याय मिळविला आणि समतेचा लढा लढतांनाच आपल्या लाखो अनुयायींना बौध्द धम्माची दीक्षा दिली. या अनुषंगाने आवारपूरातिल डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या पुढाकाराने या गावात भव्यदिव्य डॉ2 बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णकृती पुतळा बसविण्यात आला त्याला आज या ऐतिहासिक सोहळ्याला 6 वर्षे पूर्ण होत आहे. या सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन रिपब्लिकन पार्टीचे जिल्ह्यातील मुख्य नेते तथा अध्यक्ष सिध्दार्थ पथाडे यांनी परमपुज्य डाॅ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केली.
या वर्धापन दिनाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते पथाडे बोलत होते.

याप्रसंगी बोलतांना त्यांनी आपल्या मनोगतात सांगीतले की, बाबासाहेबांची देशाप्रती आस्था व निष्ठा होती. राष्ट्राच्या उत्कर्षासाठी त्यांचे योगदान शब्दापलीकडचे आहे. समाजातील प्रत्येक घटकांच्या सामाजिक न्यायासाठी त्यांनी संघर्षच केला नाही तर तो न्याय मिळेपर्यंत ते झटले. या देशाच्या मातीत रूजलेला भगवान गौतम बुध्दांचा धम्म स्विकारून त्यांनी आपल्या महानतेचे दर्शन घडविले आहे. या महामानवांच्या मानवी हक्काच्या क्रांतीलढ्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा जोपासने व तो पुढे घेऊन जाणे हे नव्या पिढीचे लक्ष्य असले पाहिजे असे सांगीतले.

या प्रसंगी आवारपूरच्या सरपंच सौ. प्रियंका दिवे , गाडेगावच्या सरपंच सौ. गिता राजुरकर , स्मार्ट व्हिलेज बिबीचे उपसरपंच प्रा, पत्रकार आशिष देरकर , सांगोडा चे माजी सरपंच सचिन बोंडे , हिरापूरचे माजी सरपंच प्रमोद कोडापे , आवारपूरचे ग्रा,प,चे सदस्य विकास दिवे , सदस्या सौ, शुष्मा पानघाटे , सदस्य सुरेश दिवे , माजी ग्रा,प,चे सदस्य शेशिकांत दिवे , नांदा येथील माजी सदस्य, अभय मुनोत , नांदाफाटा येथील काँग्रेसचे हारूण सिद्धिकी , कोरपना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश लोखंडे , हा ,भ,प, विठ्ठल डाखरे महाराज , गाडेगावचे ग्रा म .सेवक गणेश घोडमारे , निरधार समितीचे अध्यक्ष उमेश राजुरकर ,नांदा चे माजी ग्रा मप सदस्य चंद्रशेखर राउत , साथरीचे रूश्नीजी वाघमारे , सागर बोरकर , नांदाफाटा डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष कणिष्क ताकसांडे , रविकुमार वाघमारे , गौतम भसारकर , किशोर डोंगरे , सेवानिवृत्त शिक्षक माधवराव वाघमारे , तंटामुक्त अध्यक्ष सुरेश धोटे , विक्रम ताजने , रविदास करमरकर , विनोद राजुरकर , राहुल सोनटक्के ,लोकगायक सदानंद टिपले यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सर्वांनी डाॅ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने करण्यात आला समितीचे अध्यक्ष गौतम धोटे , सचिव दर्शन बदरे , उपाध्यक्ष रमेश खाडे , कोषाध्यक्ष प्रमोद चांदेकर व सर्व समितीचे सदस्याच्या वतीने विविध पक्षातील नामवंत कार्यकर्य्ताचा सत्कार करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here