शेतकरी नेते प्रभाकर दिवे यांचे निधन

0
598

 

प्रतिनिधी / राज जुनघरे

 

चंद्रपूर / राजुरा / विदर्भ :- शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, विदर्भ बळीराज्यचे उपाध्यक्ष, विदर्भ राज्य कोअर कमिटी चे सदस्य प्रभाकर दिवे यांचे आज दुपारी नागपूर येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ६६ वर्षाचे होते. पंधरा दिवसांपूर्वी प्रभाकर दिवे यांचा गडचांदुर येथे कारला ट्रकने धडक दिल्याने अपघात झाला होता. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रभाकर दिवे हे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पंधरा वर्षे मानद सचिव म्हणून कार्य, आणि पाच वर्षे चंद्रपूर जिल्हा परिषद स्विकृत सदस्य होते. माजी आमदार ॲंड. वामनराव चटप यांचे ते खंदे समर्थक, यापुर्वी त्यांनी शेतकरी संघटनेकडून विधानसभेची निवडणूक लढविली होती. गेली चाळीस वर्षे शेतकरी संघटनेच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होवून त्यांनी नेतृत्व केले. अनेकदा त्यांना कारावास भोगावा लागला. निर्भिड आणि आक्रमक नेतृत्व अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने शेतकरी संघटनेतील नेता हरपला आहे. विदर्भ राज्य चळवळीचे अपरिमित नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here