आदर्श शिक्षक व नाभिक समाजाचा जेष्ठ कार्यकर्ता हिरावला – हरीश ससनकर

0
774

आदर्श शिक्षक व नाभिक समाजाचा जेष्ठ कार्यकर्ता हिरावला – हरीश ससनकर

कोरपना/चंद्रपूर :-
आपला समाज मागे न राहता पुढे जावा या उदात्त हेतुने ते विद्यार्थी व समाजाला सतत मार्गदर्शन करत. समाजाला आपली गरज आहे या हेतूनं ते फूल ना फुलाची पाकळी नेहमी मदत करत. अख्खं आयुष्य समाजाला मार्गदर्शन करण्यात घालवलं. एक आदर्श शिक्षक म्हणून ते परिसरात ओळखले जात. निवृत्त होवून जेमतेम एक वर्ष होताच काळाने घात घातला आणि हृदय विकाराचा झटक्याने त्यांची प्राणज्योत मात्र मावळली. त्यांच्या अश्या अचानक जाण्याने नाभिक समाजात पोकळीक निर्माण झाली.

शेंडे सर हे एक आदर्श शिक्षक होते, हयात भर त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले, जिवती पहाडावरील अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आपण गरीबितून समोर आलो आपला समाज सुध्दा पुढे यावा या हेतूने नाभिक समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केले. सामाजिक जीवनात सक्रिय असतांना त्यांचा अचानक जाण्याने नाभिक समाजाचा मार्गदर्शक हिरावला. जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली- हरीश ससनकर, राज्य सरचिटणीस महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती

नाभिक समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक हिरावल्याने समाजात पोकळी निर्माण झाली. ही पोकळी कधीही भरून निघणारी नसून समाजावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. :- *सतीश जमदाडे अध्यक्ष नाभिक समाज नांदा, आवाळपूर विभाग,*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here