मनपाचे स्वच्छतादूत कोरोना योद्धेच–डॉ .मंगेश गुलवाडे ! 

0
475

नगरसेविका छबु वैरागडेंसह कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती

 

विशेष प्रतिनिधी/✍🏻किरण घाटे

 

चंद्रपूर :- संपूर्ण देशात वरुणाने हाहाकार माजला असताना मनपाचे स्वच्छता कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून काम करीत आहेत.यात कचरा संकलन करणारे घंटागाडी कर्मचारी यांचाही समावेश आहे. हे कर्मचारीदेखील कोरोना योद्धेचं आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे यांनी केले. ते संजय गांधी मार्केट येथील झोन क्रमांक एकच्या परिसरात आयोजित सुरक्षा कवच वितरण कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.

यावेळी मनपा स्थायी समिती अध्यक्ष रवी आसवानी, झोन सभापती एडवोकेट राहुल घोटेकर, नगरसेविका छबु वैरागडे, शितल आत्राम, जयश्री आत्राम, भाजपा प्रसिद्धीप्रमुख प्रशांत विघ्नेश्वर,स्वप्नील कांबळे,मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. डॉक्टर गुलवाडे म्हणाले कोरोनाने सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यामुळे मनपा सफाई कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे.

आपण करीत असलेल्या परमेश्वरी कार्याची जाणीव असल्यामुळेच आज आपला भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकां तर्फे आ. मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ३० मे २०२१ला सात वर्ष पूर्ण झाल्या प्रीत्यर्थ सत्कार करण्यात येत आहे. आपल्याला सुरक्षा कवच देण्यात येत असून या नगराच्या स्वच्छतेसाठी आपण नेहमी कर्तव्यतत्पर राहाल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व घंटागाडी कर्मचाऱ्यांना एक दुपट्टा, सॅनिटायझर,५ मास्क व बिस्किटपुडे सुरक्षा कवच म्हणून प्रदान करण्यात आले. या छोटेखानी कार्यक्रमाचे संचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले. उपस्थित सर्व कर्मचारी व अतिथी गणांचे आभार झोन सभापती एडवोकेट राहुल घोटेकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here