काऊ ये चिऊ ये दाना खा …!

0
739

काऊ ये चिऊ ये दाना खा …! 🔴मूल🔶किरण घाटेजागतिक चिमनी दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या जेष्ठ सदस्या तथा वैदर्भिय सुपरिचित लेखिका स्मिता बांडगे यांनी एक लेख लिहला आहे ताे खास वाचकांसाठी देत आहाे ! 🔴🔶🟣काऊ ये चिऊ ये दाना खा पाणी पी असे सतत म्हणत आई आपल्या इवल्या बाळाला ममतेने इवले इवले घास भरवायची .आणि ते बाळ ही त्या चिऊ कडे बघून बघून खुदकन हसून पटकन घास खाऊन घ्यायचा .आणि आईला ही बाळ जेवल्याचा आनंद काही वेगळाच होता .पण आता बाळाला चिमणी दिसतेच कुठे ती तर कधीच हरवली.तिचे वास्तव्य संपृष्ठात आले.पर्यावरणाचा समतोल ढासळला .मानवाने आपल्या स्वार्थासाठी नैसर्गिक संपदेची हानी केली.स्वतःचे राहणीमानाचा दर्जा उंचावून पशू पक्ष्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला.निसर्गाचे चक्र सुरळीत चालण्या करीता सृष्टीतील सर्व सजीवांची आवश्यकता आहे . पशू पक्ष्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे नाहीतर एक दिवस असा येईल की या भूतलावर एकही सजीव जिवंत राहणार नाही.
आज चिमणी दिन म्हणून एक दिवस साजरा केल्याने काहीच होणार नाही तर त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी उचलली पाहिजे. आपले जीवन कितीही धकाधकीचे असले तरी जमेल तेवढे पशू पक्ष्यांचे संवर्धन केले पाहिजे .आपली घरे सिमेंटची असली तरी चालेल पण मन मात्र संवेदनशील असू द्या.त्यांना आसरा द्या .त्यांना त्यांची घरटी उभारू द्या.आपले घर काडी कचऱ्यांनी खराब होईल म्हणून आपण त्यांची घरटी तोडू नये घरात नाही पण घराच्या आडोश्याला त्यांना घरटी बांधू द्या. आपल्या घराच्या छपरावर किंवा अंगणात त्यांना खायला चिमुटभर दाणे आणि पिण्यास पाणी द्या. उन्हाच्या झळांनी त्यांचा जीव कासावीस होऊ नये याची काळजी घ्या. बघा ते रोज आपल्या अंगणात येतील किलबिल करतील बागडतील .त्यांचे ते बागडणे बघून लहान मुले मोठी माणसे या सर्वांना खूप आनंद वाटेल एवढं आपण सहज करू शकतो ना
चला तर जाऊया पुढे काऊ चिऊच्या राज्यात …….🔶🟠 🔶स्मिता बांडगे मूल🔴जि.चंद्रपूर 🟢🔶🔶🔶🔶🔶

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here