मासळ बु ला सुरु झाले धान खरेदी केंद्र – परिसरातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
विकास खोब्रागडे

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मासळ बु च्या वतीने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.त्यामुळे मासळ परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मासळ परिसरात मोठ्या प्रमाणात धानाचे पिक घेतल्या जाते.परिसरातील शेतकऱ्यांना अधिक सोईचे व्हावे यासाठी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मासळ बु च्या माध्यमातून शासकीय आधारभूत धान खरेदी सुरु करण्यात आले आहे. यावेळी प्रथम धान विक्री करणारे शेतकरी प्रकाश पाटील यांचा संस्थेचा वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन संस्थेचे संचालक माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ देवनाथ गंधारे यांच्या हस्ते झाले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर नन्नावरे,उपाध्यक्ष माजी सरपंच चंद्रभान धारणे, संस्थेचे व्यवस्थापक प्रशांत ठावरी, संस्थेचे सदस्य नलूबाई नन्नावरे,भोजराज गरमडे,वाघमारे तथा संस्थेचे शिपाई नरेश मेश्राम व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.